शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021 : गोड आणि गुलदार खजूरं जेवढे खायला रुचकर असतात तेवढेच ते आरोग्यासाठीही महत्वाची असतात. हिवाळ्यात खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
एक पोषक घटक म्हणजे अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेले खजूर हिवाळ्यामुळे होणाऱ्या हंगामी आजारांवर उत्तम उपचार देतात. खजूरमध्ये साखर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. आज आम्ही तुम्हाला याचे सेवन करण्याचे फायदे सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया सविस्तर –
खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक तसेच आहारातील प्रोटिन्स ,फायबर आणि व्हिटॅमिन्स B1, B2, B3, B5 आणि C भरपूर प्रमाणात असतात. खजूरमध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यात फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. यामध्ये असलेले हे सर्व घटक चांगले आरोग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे :-
1. खजूर तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकला यासारखे आजार टाळता येतात. यासाठी रोज खजुराचे सेवन करावे.
2. रात्री खजूर भिजवून सकाळी दूध किंवा तुपासोबत खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. ज्यांना ऍनिमियाची समस्या आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.
3. हिवाळ्यात (अस्थमा) दम्याच्या रुग्णांची समस्या खूप वाढते. अशा लोकांनी खजुराचे सेवन करावे. यासाठी सुक्या आल्याची पावडर बनवून त्यात खजूर मिसळून सेवन करा. याचा तुम्हाला फायदा होईल.
4.लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास तीन ते चार खजूर गाईच्या दुधासोबत खाऊ शकतात.यामुळे रक्तदाब नॉर्मल राहतो.
5. रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी सेवन करा. हा उपाय केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल.
खजूर त्वचेसाठी फायदेशीर:-
खजूर आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-डी आढळतात, ज्यामुळे त्वचा नितळ होण्यास मदत होते. यासोबतच वाढत्या वयासोबत त्वचेच्या समस्यांपासून बचाव होतो. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास, खजूरमध्ये वृद्धत्वविरोधी (अँटी-एजिंग प्रॉपर्टी)गुणधर्म आढळतात.
या लोकांनी खजूर खाऊ नये –
1. जर तुमचे वजन खूप वाढले असेल तर तुम्ही खजूर खाणे टाळावे. कारण याचे सेवन केल्याने तुमचे वजन आणखी वाढू शकते.
2. जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर खजूर तुमच्यासाठी घटक ठरू शकतात.
3. जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्याचे सेवन करणे टाळा.
4. आयुर्वेदानुसार ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनीही खजूर मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
5. जर तुम्हाला डायरियाची समस्या असेल तर तुम्ही खजूर खाऊ नये. हे तुमच्यासाठी घटक ठरू शकतं.
रोज किती खजूर खावेत?
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात दररोज सकाळी नाश्त्यामध्ये चार ते पाच खजूर खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. तसेच ऊर्जा मिळते.
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात दररोज सकाळी नाश्त्यामध्ये चार ते पाच खजूर खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. तसेच ऊर्जा मिळते.