शेतकरी शेतीसाठी ट्रॅक्टरसह अनेक प्रकारची कृषी यंत्रे खरेदी करतात. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभही दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात ही कृषी यंत्रे मिळतात. विविध राज्य सरकारे शेतकऱ्यांना त्यांच्या विहित नियमांनुसार कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदानाचा लाभ देतात. महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता..
शेतकऱ्यांना आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 14 फुटापर्यंतचे स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर, 10 फुटांपर्यंतचे ट्रॅक्टरचलित कम्बाईन हार्वेस्टर, याप्रमाणे 6 ते 8 फुटापर्यंतचे ट्रॅकचलित कम्बाईन हार्वेस्टर व 6 फुटापेक्षा कमी असणारे ट्रॅकचलित कम्बाईन हार्वेस्टर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कम्बाईन हार्वेस्टर करता 3 लाखांपासून 11 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं.
आता या हार्वेस्टर करता अर्ज कसा करायचा ? यासाठी किती अनुदान दिलं जातं ? काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना ? पात्रता अटी काय आहेत ? याबाबत सविस्तर माहिती आपण ”शेतीशिवार” च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
नव्या मार्गदर्शक सूचना..
आपण पाहिलं तर 19 जुलै 2022 रोजी एक मार्गदर्शक सूचना कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भात निर्गमित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जे हार्वेस्टरचे अनुदान देण्यात आले होते यामध्ये बदल करण्यात आले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये राज्यातील कृषी यांत्रिकीकरण करण्याच्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या अनुषंगाने 8 डिसेंबर 2022 रोजी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंबालबजावणीसाठी नव्या मार्गर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. यासाठी खालीलप्रमाणे अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
पहा, किती मिळणार अनुदान…
*************
किती असते ट्रॅक टाइप पॅडी हार्वेस्टरची कीमत..
“ट्रॅक टाइप पॅडी हार्वेस्टर”ची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे, शेतकरी त्यांच्या स्तरावर डीलरशी बोलणी देखील करू शकतात. ज्यावर सरकारकडून जास्तीत जास्त 50% अनुदान दिले जाते. ट्रॅक टाइप 6 – 8 फूट कटर बारसाठी, कमाल 11,00,000 लाख रुपये आणि 6 – 8 फूट कटर बारपेक्षा कमी ट्रॅक टाइपसाठी, कमाल 7,00,000 रुपये अनुदान दिलं जातं.
हे पण वाचा : पीक फवारणी यंत्र योजना : 2022 | पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1 लाख 25000 पर्यंत अनुदान
कम्बाईन हार्वेस्टरसाठी कसा कराल अर्ज..
या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावं लागेल, किंवा आपला आधार कार्ड ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता…
लॉगिन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला तुमचं प्रोफाइल हे 100% दाखवणं गरजेचं आहे.
यानंतर तुम्हाला ”अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे. अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आणि एक शेतकरी एक अर्ज अंतर्गत आपल्याला सर्व बाबीचा अर्ज एकाच पोर्टल वरती करता येतो.
यात आपल्याला ‘’कृषी यांत्रिकीकरण’’ ही बाब निवडा या अंतर्गतच आपल्याला अर्ज करायचा आहे.
‘कृषी यांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक केल्यांनतर अर्ज तुमच्या समोर उघडेल.
यानंतर तुम्हाला ‘’मुख्य घटक’’ हा ऑप्शन दिसेल, यामध्ये ”कृषी यांत्रिकीकरण खरेदीसाठी अर्थसाहाय्य” या वर क्लिक करायचं आहे.
या नंतर ‘’तपशील निवड’’ हा ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल त्यातील ‘’ट्रॅक्टर पॉवर चलित औजारे’’ या वर क्लिक करायचं आहे.
या नंतर तुम्हाला HP श्रेणी हा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये ’35 BHP पेक्षा जास्त’ हा ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर यंत्रसामग्री / अवजारे / उपकरणे हा एक ऑप्शन दिसेल. त्यावर निवड करा वर क्लिक करून ”कापणी यंत्रे” ही बाब निवडा.
या नंतर तुम्ही ”मशीनचा प्रकार” या यावर क्लिक करून तुम्हाला कम्बाईन हार्वेस्टरचे तब्बल 6 प्रकार दिसतील, त्यातील ”कम्बाईन हार्वेस्टर ( स्वयंचलित 14 फूट कटरबार सह)” या ऑप्शनवर क्लिक करा. ( तुम्हाला कोणता हवा त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता )
या वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ”जतन करा” यावर क्लिक करा…
अर्ज जतन करल्यानंतर तुम्हाला घटक तपशील यशस्वीरीत्या जोडला आहे. अजून घटक जोडायचा आहे का ? तर तुम्हाला ‘NO’ म्हणायचं आहे. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर 23.60 रु. पेमेंट करावं लागेल.
प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर ‘WINER’ हा मॅसेज प्राप्त होईल या नंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील अन् तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल.
टीप : शेतकरी मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक हा अर्ज करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरही जाणून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता…