Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापसाचे दर 8 हजारांच्या उंबरठ्यावर, पुढे काय होणार? जाणून घ्या..
कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. यापूर्वी गुजरात या बाबतीत आघाडीवर होता. येथील हवामान आणि माती कापूस लागवडीसाठी योग्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन होते. कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कापसाच्या 27.10 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते..
मात्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना यंदा पूर्वीप्रमाणे भाव मिळाला नाही. तथापि, प्राप्त होणारी किंमत किमान आधारभूत किंमत (MSP) पेक्षा जास्त आहे. 2023 – 24 या वर्षासाठी सरकारने कापसाचा एमएसपी प्रति क्विंटल 6620 रुपये निश्चित केला आहे.
गेल्या 2 वर्षांपूर्वी कापसाच्या भावाने प्रतिक्विंटल 10 हजारांचा टप्पा ओलांडला होता. परंतु त्यानंतर कापसाच्या दरांत मोठी घसरण होऊन दर निम्म्याने कमी झाले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी साठवणुकीवर भर दिला आहे. पण त्याचा अंदाज खरा ठरला असून दिवाळीनंतर कापसाच्या दरांत वाढ होताना दिसून येत आहे.
कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रथमच अकोल्याच्या अकोट बाजारपेठेत कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार 825 रूपये दर मिळाला आहे. याआधी दरांत चढ – उतार सुरु होते अन् दरही 6 हजारांच्या आसपास राहत होते.
परंतु दिवाळीनंतर भावात दीड हजार रुपयांची वाढ दिसून आली. त्यामुळे आता कापूस उत्पादकांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. कापसाचे भाव असेच वाढत राहिल्यास साठवणुकीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, दिवाळीनंतर बाजारपेठेतील चित्र बदलत असून कापसाचे दर केवळ स्थिरच नसून ते वाढत आहेत. कापूस उत्पादकांसाठी हा मोठा दिलासा आहे..
या राज्यांमध्ये 80 टक्के कापूस उत्पादन..
कापूस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असताना गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जे 20.55 टक्के कापूस उत्पादन करते. त्यानंतर 16.94 टक्के कापूस उत्पादन करणारे राजस्थान आहे. त्यानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये ९.०६ टक्के कापूस उत्पादन होते आणि त्यानंतर ६.५६ टक्के कापूस उत्पादन करणारे कर्नाटक आहे. याशिवाय इतर राज्येही आहेत. जे उर्वरित 20 टक्के कापूस उत्पादन करते..
पहा आजचे कापूस बाजारभाव..
सरकीचे दर उत्पादनही घटले..
खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत.
गेल्या वर्षी 4 हजार 200 रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी 3 हजार 300 ते 3 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.