केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना खूप मोठा असणार आहे. मार्चमध्ये, सरकार जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता (DA Hike) येत्या दिवसांत कधीही मंजूर करू शकते. तसेच मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पगारातही ही रक्कम देण्यात येणार आहे. होळीपूर्वी सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देईल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे पैसेही एकरकमी मिळतील. म्हणजेच त्यांना जानेवारी ते मार्च 2024 पर्यंतची थकबाकीही मिळेल. याशिवाय एप्रिलचा डीएही त्यात समाविष्ट केला जाणार आहे. पण, ही थकबाकी किती असेल ?याबाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेऊया..

तुम्हाला डीए थकबाकीचा लाभ कधी मिळणार ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढणार आहे. मार्चमध्ये त्याला मंजुरी मिळू शकते. एप्रिलमध्ये ते खात्यावर जमा होईल. परंतु, त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चपर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून दिला जाईल. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्यांच्या थकबाकीचा लाभही मिळेल. नवीन वेतनश्रेणीमध्ये, पे बँडनुसार महागाई भत्ता मोजला जाईल. लेव्हल -1 मधील कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 1800 रुपये आहे. यामध्ये मूळ वेतन 18000 रुपये आहे. याशिवाय प्रवास भत्ता (TPTA) देखील त्यात जोडला जातो. त्यानंतरच आर्थिक थकबाकी निश्चित केली जाते..

आता असा घ्या हिशोब समजून.. 

लेव्हल – 1 मधील किमान पगाराची गणना रु. 18,000

लेव्हल – 1 ग्रेड पे – 1800 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण भत्त्यात 774 रुपयांची तफावत आली आहे. याप्रमाणे थकबाकीचा हिशोब समजून घ्या..

 देय आणि थकबाकी (DA 50%)
महिना DA TA DA ON TA एकूण
जानेवारी -24 9000 1350 675 11025
फेब्रुवारी  -24 9000 1350 675 11025
मार्च -24 9000 1350 675 11025
Arrears 2322
एप्रिल-24 9000 1350 675 11025

लेव्हल -1 मध्ये कमाल मूळ पगाराची गणना रु. 56900

लेव्हल-1 ग्रेड पे – 1800 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात 2276 रुपयांची तफावत आली आहे. याप्रमाणे थकबाकीचा हिशोब समजून घ्या..

 देय आणि थकबाकी (DA 50%)
महिना DA TA DA ON TA एकूण
जानेवारी-24 28450 3600 1800 33850
फेब्रुवारी-24 28450 3600 1800 33850
मार्च-24 28450 3600 1800 33850
Arrears 7260
एप्रिल-24 28450 3600 1800 33850

लेव्हल 10 मध्ये किमान पगार 56,100 रुपये मोजला जातो

लेव्हल – 10 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ग्रेड – पे 5400 रुपये आहे. या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 56,100 रुपये आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात 2244 रुपयांची तफावत आली आहे. याप्रमाणे थकबाकीचा हिशोब समजून घ्या..

 देय आणि थकबाकी (DA 50%)
महिना DA TA DA ON TA एकूण
जानेवारी-24 28050 7200 3600 38850
फेब्रुवारी-24 28050 7200 3600 38850
मार्च-24 28050 7200 3600 38850
Arrears 7596
एप्रिल-24 28050 7200 3600 38850

पे – बँडने ठरवला जातो पगार..

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन स्तर – 1 ते स्तर 18 पर्यंत वेगवेगळ्या ग्रेड पेमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये ग्रेड – पे आणि प्रवास भत्त्याच्या आधारे महागाई भत्ता मोजला जातो. लेव्हल 1 मध्ये, किमान पगार 18,000 रुपयांपासून सुरू होतो आणि कमाल पगार 56,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे स्तर 2 ते 14 पर्यंतच्या ग्रेड पेनुसार पगार बदलतो. परंतु, स्तर-15, 17, 18 मध्ये ग्रेड पे नाही. इथे पगार ठरलेला असतो.

लेव्हल – 15 मध्ये, किमान मूळ वेतन 182,200 रुपये आहे, तर कमाल वेतन 2,24,100 रुपये आहे. लेव्हल-17 मध्ये मूळ वेतन 2,25,000 रुपये निश्चित केले आहे. त्याच वेळी, लेव्हल-18 मध्ये देखील मूळ वेतन 2,50,000 रुपये निश्चित केले आहे. कॅबिनेट सचिवांचा पगार 18 व्या स्तरावर येतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *