Take a fresh look at your lifestyle.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! 1 जानेवारीपासून पगारात होणार तब्बल 10,500 रुपयांची वाढ, पहा कॅल्क्युलेशन..

0

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना त्यांच्या वाढलेल्या डीएचे (DA) पैसे मार्चपासून मिळणार आहेत. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जानेवारी 2023 च्या वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी दिली जाणार आहे. यात दोन महिन्यांच्या थकबाकीचाही समावेश असणार आहे.

म्हणजे एकूण 42% नुसार DA पेमेंट मिळणार आहे. त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. जानेवारी 2023 चा DA जाहीर झाला आहे. एआयसीपीआयच्या (AICPI) आकडेवारीवरून त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाल्याचे स्पष्ट झालं आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, जानेवारी 2023 पासून DA 42 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

DA मध्ये किती होणार आहे वाढ..

52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सुटका (DR) मध्ये ही वाढ झाली आहे. जेसीएम (JCM) च्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, 7 व्या वेतन आयोगाच्या DA वाढीअंतर्गत मिळणारा महागाई भत्ता (DA) सध्या 38% आहे, जो यावेळी 42% असणार आहे. जानेवारी 2023 मध्ये DA 4 टक्क्यांनी वाढला आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA त्यांच्या मूळ वेतनाच्या 42% पर्यंत वाढवला जाईल. त्यानुसार DR देखील मोजला जाईल..

कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार..!

7व्या वेतन आयोगा-अंतर्गत पगाराच्या कॅल्क्युलेशनसाठी, कर्मचार्‍यांच्या मूळ पगारावर DA मोजावा लागेल. समजा एखाद्याचा मूळ पगार (किमान वेतन) 25,000 रुपये असेल, तर त्याचा DA 25,000 रुपयांच्या 42% इतका वाढेल. याचा अर्थ DA मध्ये वाढ 25,000 रुपयांच्या 42% म्हणजेच एकूण 10,500 रुपये असेल. त्याचप्रमाणे, इतर केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन देखील 7 व्या CPC पे मॅट्रिक्समध्ये भिन्न असणार आहे. तुमचा मूळ पगार पाहून त्याचे कॅल्क्युलेशन करता येते.

कॅल्क्युलेशन समजून घ्या..

लेवल 1 मूळ वेतन = रु. 18000

42% DA = रु. 7560 प्रति महिना

लेवल 1 मूळ वेतन = रु. 25000

42% DA = रु. 10500 प्रति महिना

पगारात किती पडणार फरक ?

7 व्या वेतन आयोगामध्ये, सध्या 38% दराने महागाई भत्ता (DA) दिला जातो. 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला सध्या 6,840 रुपये महागाई भत्ता मिळतो. मात्र, वाढ केल्यानंतर 7560 रुपये महागाई भत्ता मिळेल. त्याच वेळी, 25,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या 9,500 रुपये मिळतात, जे वाढीनंतर 10,500 रुपये होतील. डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे दिसत आहे.

टीप : येथे कॅल्क्युलेशन केवळ वाढीव DA सह केलं गेलं आहे. DA वाढवल्याचा परिणाम इतर भत्त्यांवरही होतो. त्यामुळे अंतिम कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.