Take a fresh look at your lifestyle.

देशातली पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस राज्यातील ‘या’ शहरात धावणार ! 2 कोटी किंमत, 80 प्रवाशी क्षमता, पहा असा असणार रूट..

0

देशातील पहिली एसी डबल डेकर बस लवकरच सेवेत दाखल होणार आहे. याबाबत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), पुणे कडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालं आहे. स्विच नावाच्या कंपनीने बनवलेली ही बस ऑगस्ट 2022 मध्येच आली होती. सेवेत येण्यापूर्वी त्याला ARAI ची मंजुरी आवश्यक होती त्यामुळे आता मंजुरी मिळाल्याने धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही बस मुंबईत दाखल झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली सेवा आठवडाभरात सुरू होणार असून हैदराबादस्थित स्विच कंपनीने सांगितले की, आतापर्यंत ARAI च्या मंजुरीची प्रतीक्षा होती. आता पहिल्या टप्प्यात दहा बस लवकरच मुंबईला पाठवण्यात येणार आहेत. या मॉडेलचे नाव Switch EiV22 आहे, ज्यामध्ये 231 kWh बॅटरी आहे आणि एका चार्जवर 250 किमीची रेंज आहे.

बसची ऑपरेशनल रेंज 180 किमी पर्यंत असणे अपेक्षित आहे, कारण सेवेमध्ये रस्त्याची गुणवत्ता, रहदारी आणि हवामान यासारखे अनेक घटक विचारात घेतले जातात. 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बस 100 किमी पर्यंत धावू शकते, तर पूर्ण चार्जिंगला 80 मिनिटे लागतात. बसची बॉडी अँल्युमिनियमची आहे. एका बसची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये एकाचवेळी 80 लोक प्रवास करू शकतात.

200 बसेसचा होणार समावेश..

अशोक लेलँडच्या स्विच कंपनीला बेस्टकडून 200 एसी डबल डेकर बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनी एक ते दीड वर्षात पूर्ण करणार असून 200 एसी बसेस सेवेत दाखल होणार आहे, तेव्हा बेस्टला त्याचा कार्बन फूटप्रिंट सुमारे 41 टक्क्यांनी कमी करता येईल आणि दरवर्षी 26 दशलक्ष लिटर डिझेलची बचत होईल. बेस्टकडे सध्या 45 जुन्या डिझेल डबल डेकर बस आहेत ज्या जून 2023 पर्यंत सेवेतून बंद होणार आहे. या सर्व 45 बसेस जून 2023 पर्यंत नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बसने बदलल्या जाणार आहे.

कधी होणार सुरु..

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) ने सोमवारी देशातील पहिल्या इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसचे उद्घाटन केले. मात्र, प्रवाशांना प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. बेस्टच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील प्रादेशिक परिवहन एजन्सीने इलेक्ट्रिक बसची नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही आणि नवीन वाहन व्यावसायिक ऑपरेशन सुरू होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात.

मुंबई एसी डबल डेकर बसचे संपूर्ण डिटेल्स :-

रूट :

बस कुर्ला बस डेपो आणि वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान धावणार असल्याची चारचा आहे. पूर्ण रूट अद्यापही ठरलेला नाही आणि अधिकृतपणे खुलासा झाल्यांनतर संपूर्ण रूट फायनल होणार आहे.

तिकिट प्राईस : 

तिकिटाची किंमत पूर्वीप्रमाणेच असून – 5 किमी अंतरासाठी किमान 6 रुपये भाडे आकारलं जाईल.

इतर सुविधा :

इलेक्ट्रिक डबल डेकर बसमध्ये 80 लोक बसू शकतात. यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ऑटोमॅटिक दरवाजे देण्यात आले आहेत. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बस 80 मिनिटांत चार्ज होऊ शकते, सध्या, परिवहन उपक्रमाकडे विविध आकाराच्या 45 इलेक्ट्रिक एसी बस आहेत आणि या वर्षी टप्प्याटप्प्याने आणखी 100 वेट – लीज बसेस त्याच्या ताफ्यात जोडल्या जातील. सध्या मुंबईच्या रस्त्यावर एकच बस धावणार आहे.

काय आहे बेस्टची योजना..

बेस्टकडे सध्या 3600 बसेस असून, या वर्षअखेरीस 7 हजारांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये बेस्टच्या महिला स्पेशल बसेसची संख्या 500 वर नेण्यात येणार आहे, ती सध्या 136 आहे. परिवहन तूट आणखी कमी करण्यासाठी बेस्टने पुढील वर्षी सर्व बस टॅप – इन – टॅप – आउट करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. याचा अर्थ सर्व बस कंडक्टरविना असणार आहे. बेस्टकडे सध्या 200 डिजिटल म्हणजेच टॅप इन – टॅप आउट बसेस आहेत.

2026 पर्यंत, जेव्हा बेस्टच्या ताफ्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असतील, तेव्हा इंधनाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी प्रति किमी सुमारे 150 रुपये खर्च येतो, परंतु प्रति किमी केवळ 50 रुपये कमावतात. 150 रुपयांमध्येही सुमारे 90 रुपये मनुष्यबळ आणि उर्वरित इंधनावर खर्च होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.