केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै 2023 पासून वाढणारी डीए वाढीची प्रतीक्षा लवकरच संपणार असून सरकार याबाबत मोठा निर्णय घेणार आहे. AICPI इंडेक्सचे आकडे आल्यानंतर त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे सूचित केले जाते. पण, ते सरकार ठरवते आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पुढे नेले जाते. गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याबाबत (DA) काही रिपोर्टमध्ये त्यात 3 टक्क्यांनी वाढ होईल, असा दावा करण्यात आला होता. म्हणजेच सध्याचा दर 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर जाईल. पण, हा दावा निराधार आहे. चला तर मग जाणून घेऊया की DA नेमका किती वाढणार ?

तसं पाहिलं तर, महागाई भत्ता (DA) अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या मासिक आकड्यांच्या आधारे ठरवला जातो. जुलै 2023 पासून लागू होणार्‍या महागाई भत्त्याची संख्या जानेवारी ते जून या कालावधीत AICPI निर्देशांकाद्वारे ठरवली जाते. सहा महिन्यांच्या आकड्यांचा कल बघितला तर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करावी लागणार आहे. खाली दिलेल्या कॅल्क्युलेशनवर एक नजर टाका. अशा स्थितीत 3 टक्के वाढ झाल्याची चर्चा निरर्थक अन् चुकीची वाटते. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा आहे. पण, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेपर्यंत आपण बोलणं घाईचं ठरू शकतं..

नो कन्फ्युजन, महागाई भत्ता 4 टक्के वाढणारचं..

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के सुधारणा होणार असल्याचा अहवाल आला होता. पण, ही 3 टक्के कॅल्क्युलेशन कुठून आलं, त्यामागचं कारण स्पष्ट झालेले नाही. हिशोब बघितला तर, यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निश्चित झालं आहे.

कसे होणार DA चे कॅल्क्युलेशन..

तज्ञांच्या मते, जुलै 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही. यामागील तर्क असा आहे की, किंमत निर्देशांकाच्या गुणोत्तरामध्ये दाखविलेल्या हालचालींमुळे DA स्कोअर 46 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जूनमध्ये निर्देशांकाची संख्या 136.4 अंकांवर होती. या आधारे कॅल्क्युलेशन पाहिल्यास, DA स्कोअर 46.24 वर पोहोचला आहे. याचा अर्थ DA मध्ये एकूण 4% वाढ होईल. कारण, DA राउंड फिगरमध्ये दिला जातो आणि जर तो 0.51 पेक्षा कमी असेल तर तो फक्त 46 टक्के मानला जाईल..

आता हे कॅल्क्युलेशन समजून घ्या..

डिसेंबर 2023 मध्ये निर्देशांक क्रमांक 132.3 अंक होता, ज्यामुळे एकूण DA स्कोअर 42.37 टक्के झाला. यानंतर, जानेवारीत निर्देशांक 132.8 वर पोहोचला आणि DA स्कोअर 43.08 पर्यंत वाढला. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याचा स्कोअर ठरवला जातो. खाली दिलेलं कॅल्क्युलेशन पहा..

Month AICPI निर्देशांक  DA % वाढ 
जानेवारी -2023 132.8 43.08
फेब्रुवारी – 2023 132.7 43.79
मार्च – 2023 133.3 44.46
एप्रिल – 2023 134.2 45.06
मे – 2023 134.7 45.58
जून – 2023 136.4 46.24

गॅरेंटेड 46 टक्के होणार महागाई भत्ता..

वर दिलेला हिशोब पाहिला तर पुन्हा एकदा 7 व्या वेतन आयोगात 4 टक्के वाढ होईल. यामुळे एकूण महागाई भत्ता 46 टक्क्यांवर जाईल. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून होणार आहे. परंतु, त्याच्या घोषणेसाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला याची घोषणा केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून ते जाहीर होईपर्यंत थकबाकी (DA Arrears) दिली जाईल..

पगारात किती होणार वाढ..

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (46%) रु.8280 / महिना
3. आजपर्यंतचा महागाई भत्ता (42%) रु.7560 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 8280 -7560 = रु 720 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640

मूळ वेतन 56900 रुपये पगारावर कॅल्क्युलेशन..

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु. 56,900
2. नवीन महागाई भत्ता – (46%) रु 26,174 / महिना
3. आत्तापर्यंतचा महागाई भत्ता – (42%) रुपये 23,898/महिना
4. महागाई भत्ता किती वाढला – 26,174-23,898 = रु 2276 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *