सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देऊन करोडो लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकार 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी DA जाहीर करणार आहे. यामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. (DA Hike)

कधी जाहीर होणार ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार नवरात्रीच्या काळात कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. वास्तविक, दरवर्षी नवरात्रीच्या काळात सरकार बैठक घेते आणि DA वाढ मंजूर करते, असा पॅटर्न आहे. या दृष्टीकोनातून, केंद्रीय कर्मचार्‍यांना 15 ऑक्टोबरनंतर केव्हाही DA वर चांगली बातमी मिळू शकते. निवडणूक आयोग लवकरच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा निर्णय घेणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकते म्हणून नवरात्रीतच हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

कर्मचारी जुलैपासून पाहत आहे वाट..

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत आणि सरकार महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. जर वाढ झाली तर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारात येईल. यासोबतच जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकीही मिळणे अपेक्षित आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे..

LPG वर दिलासा.. 

सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपये केले आहे. अशाप्रकारे आता देशाची राजधानी दिल्लीतील लाभार्थ्यांना 603 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. एका वर्षात 12 एलपीजी सिलिंडरसाठी ही सबसिडी दिली जाईल. याचा फायदा 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *