वडाळा – ठाणे कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ या 32.32 किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे जोडणीचा विकासाचा मार्ग साकारला जाणार आहे.

या मार्गामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या पर्यायांबरोबरच मेट्रो प्रवासाचा नवा पर्याय जोडला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने कारशेडचा मार्ग मोकळा केल्यामुळे आता ठाणे मेट्रो जोडणी सर्वसामान्यांसाठी दिलासा देणार आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग, मध्य रेल्वे, मोनोरेल, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 आणि ठाणे ते कल्याण मेट्रो 5. आणि कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो 3 या सर्व प्रकल्पांना जोडणारा एकमेव मेट्रो मार्ग ठरणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबई ते ठाणे प्रवासाच्या वेळेत कपात होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात 200 हून अधिक किलोमीटर मेट्रोचे जाळे विकसित करण्याचा निर्धार करण्यात आल्यानंतर प्रथमच ठाणे आणि मुंबई जोडणाऱ्या मेट्रो 4 मार्गिकेसाठी मंजुरी देण्यात आली असून, आतापर्यंत मुंबई मेट्रो मार्ग 4 ची स्थापत्य काम 58 टक्के व 4 अ ची स्थापत्य कामे 69 टक्के पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे आता मेट्रो रुळ बसवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. मेट्रो 4 आणि 4 अ दरम्यान मुलुंड अग्निशमन स्थानक ते गायमुख स्थानक आणि गायमुख स्थानकातील सायडिंग तसेच डेपोला जोडणारा बॅलॅस्टिक्स रेल्वेमार्गाच्या कामासाठी संरचना (डिझाईन), उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि मार्ग कमिशनिंग करणे या कामाकरता 121 कोटी 55 लाख 91 हजार 349 रुपयांचे कंत्राट एमएमआरडीएने मे. अपूर्व क्रिती इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना दिले आहे.

वडाळा ते कासारवडवली :-

अंतर 32.32 किमी
अंदाजे खर्च: रु. 14,549 कोटी
सर्व स्थानके उन्नत..

■ मेट्रो स्थानके

भक्तीपार्क, वडाळा टीटी, आणिक नगर बस स्थानक, सिद्धार्थ कॉलनी, गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मीनगर श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्यानगर, गांधीनगर, नेव्हल हौसिंग, भांडुप, भांडुप मेट्रो, शांग्रील, सोनापूर, फायरस्टेशन, मुलुंड नाका, ठाणे तीनहात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकू जीनी वाडी, डोंगरीपाडा, विजयगार्डन, कासारवडवली.

■ कासारवडवली ते गायमुख :-
अंतर – 2.88 km
अंदाजे खर्च: रु 949 कोटी

सर्व स्थानके उन्नत..

■ मेट्रो स्थानके – कासारवडवली, गोवनीपाडा, गायमुख

Mumbai Metro – मेट्रो 4 व 4 A – रूट मॅप पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

मोघरपाडा कारशेड..

मोघरपाडा येथील सुमारे 42.25 हेक्टर जागेत
कारडेपोमध्ये स्टॅबलिंग यार्ड,
ऑपरेशनल कंट्रोल सेंटर आणि प्रशासकीय इमारत

देखभाल व कायर्शाळेच्या इमारती
सहाय्यक सबस्टेशन, स्टाफ क्वार्टर
आर्कटेक्चरल फिनिशिंग

प्लम्बिंग जमीन विकासासाठी मुकाम
कुंपण, रस्ता, डेपोला जोडणारा पूल, भूमिगत सेवावाहिनी
डेपोतील पायाभूत सुविधांचे बांधकाम सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
मैला प्रक्रिया संयंत्रचे संकल्पचित्र आणि बांधणी

आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि प्री – इंजिनीयर्ड बिल्डिंग स्ट्रक्चर्सचा समावेश
मोघरपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या डेपोमध्ये 64 स्टेबलिंग लाईन – 32 या सध्या वापरल्या जातील तर 32 लाईन्सची तरतूद ही भविष्यासाठी
10 इन्स्पेक्शन बे लाईन, 10 वर्कशॉप लाईन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *