2023 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर घेऊन आलं आहे. या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकामागून एक चांगली बातमी येणार आहे. वर्षाची सुरुवात महागाई भत्त्यात प्रचंड वाढीने झाली. मागील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के केला गेला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA Hike) दरवर्षी दोनदा वाढवला जातो. पण, ही वाढ महागाई वर अवलंबून आहे. महागाईच्या प्रमाणामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांत वाढ अपेक्षित असून महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जाईल. जाणून घेऊ कसे…?
महागाई भत्ता पुन्हा 4 टक्क्यांनी वाढणार..
अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली. पुढील महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. पुढील वाढ देखील 4 टक्क्यांनी होईल,अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्या प्रकारे महागाई आहे आणि CPI-IW चे दोन महिन्यांचे आकडे आले आहेत, त्यावरून येत्या काही दिवसांत महागाई भत्ताही 4 टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे 42 वर पोहोचलेला महागाई भत्ता जुलैमध्ये 46% इतका होऊ शकतो.
नवीन नियमामुळे महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहचणार..
महागाई भत्त्याचा नियम आहे. 2016 साली जेव्हा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला, तेव्हा महागाई भत्ता हा शून्य केला गेला होता. नियमांनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्य केला जाईल आणि 50 टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील.
उदाहरणाद्वारे पाहूया..
समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये आहे तर त्याला 50% DA पैकी 9000 रुपये मिळतील. परंतु, DA 50% झाल्यानंतर, तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल. म्हणजे मूळ वेतन 27000 रुपये केले जाईल.
महागाई भत्ता शून्य का होणार ?
नवीन वेतनश्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा DA मूळ वेतनात जोडला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100% DA मूळ पगारात जोडला जावा, पण हे शक्य नाही. यासाठी आर्थिक स्थिती आड येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आलं होतं. त्याआधी म्हणजे 2006 मध्ये सहावी वेतनश्रेणी आली, तर पाचव्या वेतनश्रेणी मध्ये डिसेंबरपर्यंत 187% भत्ता म्हणून मिळत होता.
संपूर्ण DA मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे 6 व्या वेतनश्रेणीचे गुणांक 1.87 होते. नवीन ग्रेड पे व पे बँड बनवण्यात आले. मात्र, त्यासाठी तीन वर्षे लागली.
सरकारवर वाढता आर्थिक बोजा..
2006 सालात सहाव्या वेतन आयोगावेळी नवे वेतनमान दिनांक 1 जानेवारी 2006 पासून लागू करण्यात आले. परंतु यायच्या आधी सूचना दिनांक 24 मार्च 2009 रोजी जारी करण्यात आली. झालेल्या या विलंबामुळे सरकारला 39 ते 42 महिन्यांच्या DA Arrear तीन टप्प्यांमध्ये म्हणजे तीन वार्षिक वर्ष 2008 ते 2009, 2009 ते 2010, 2010 ते 2011 या काळात भरावा लागला.
यावेळी नवीन पे स्केल म्हणजेच नवीन वेतन श्रेणी देखील तयार करण्यात आली. पाचव्या वेतनमाना मध्ये 8000 ते 13,500 च्या वेतनमानामध्ये 8000 या रकमेवर 186% DA 15000 रू. इतका असायचा. त्यामुळे दोन्हींची एकूण केल्यावर एकूण वेतन 22 हजार 880 रुपये इतके झाले. सहाव्या वेतनमानात या समक्ष वेतन मानामध्ये 5600 ते 39100 अधिक 5400 ग्रेड पे निर्धारित केला गेला.
सहाव्या वेतनश्रेणी मध्ये याचे समकक्ष वेतन 15600-5400 आणि अधिक 21000 होते आणि 1 जानेवारी 2009 रोजी 16% डीए 2226 जोडून एकूण 23 हजार 226 रुपये पगार निश्चित करण्यात आला.
1986 मध्ये चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशी, तर 1996 मध्ये पाचव्या आणि 2006 मध्ये सहाव्या लागू झाल्या. जानेवारी 2016 मध्ये सातव्या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या.
7 व्या वेतन आयोगा नुसार किती पगार वाढणार ?
HRA मध्येही होणार 3 टक्क्यांनी वाढ..
हाऊस रेंट अलाउन्स ज्याला आपण घरभाडे भत्त्या म्हणतो यामध्ये देखील पुढील सुधारणा देखील 3% इतकी असेल. जास्तीत जास्त सध्याचे 27% दर वाढवून 30 टक्केपर्यंत वाढतील. पण, हे तेव्हाच होऊ शकत जेव्हा (Dearness allowarevise) महागाई भत्त्याची सुधारणा 50% च्या पुढे जाईल.
वित्त विभागाच्या मेमोरँडमनुसार, जेव्हा डीए 50% ची मर्यादा ओलांडतो तेव्हा HRA 30%, 20% 10% होईल. घरभाडे भत्ता म्हणजेच (HRA) ची X, Y आणि Z या शहरांनुसार वर्गवारी केली जाते.
X श्रेणीत मोडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27% HRA मिळत आहे, DA 50% झाल्यानंतर हा भत्ता 30% होईल. तसेच, Y श्रेणी मधील कर्मचाऱ्यांसाठी, 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. तर Z श्रेणी साठी 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल.