अब दिल्ली दूर नहीं! महिनाभर थांबा, फक्त 10 तासांत पार होणार 1386Km चा प्रवास, चेन्नईही अंतर घटणार, पहा गडकरींचा सुपर प्लॅन..
जेव्हा जेव्हा दिल्ली ते मुंबई प्रवासाचा विचार येतो तेव्हा लोक ट्रेन किंवा फ्लाइटचा विचार करतात, कारण 1300 किलोमीटरचा लांबचा प्रवास रस्त्याने पार करणे म्हणजे मोठा पर्वत चढल्यासारखे वाटतं. पण, आता हा मार्ग रोमहर्षक होणार आहे. दोन महानगरांमध्ये रस्त्यावरून जाण्यासाठी लागणा-या वेळेमुळे लोकांना कारने प्रवास करणे आवडत नाही. अशा लोकांसाठी सरकारने असा सुपर प्लॅन बनवला आहे की, ते आता फक्त महिनाभर वाट पाहतील आणि नंतर दिल्लीहून सकाळी निघून मुंबईत संध्याकाळी आरामात घरी पोहचतील अन् तेही स्वतःच्या गाडीतचं..
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस वे – या वर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होईल. याचा अर्थ असा की ,तो त्याच्या नियोजित वेळेच्या सुमारे एक वर्ष आधी प्रवासासाठी खुला होणार आहे. 1,386 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे देशातील सर्वात लांब आहे. सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चून तयार होणारा हा एक्स्प्रेस वे डिसेंबरपर्यंत तयार होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल 12 तासांनी कमी होणार आहे.
कुठपर्यंत झालंय काम ?
दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वेचे वडोदरा पर्यंतचे काम आम्ही पूर्ण केले असून पंतप्रधान मोदींनी रतलामपर्यंतच्या भागाचे उद्घाटन केलं असल्याचे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, सुरतपर्यंत एक्सप्रेस – वे बांधला गेला आहे आणि त्यापुढे कामाचे 12 भाग करण्यात आले आहेत. यातील 6 भागांच्या निविदा आतापर्यंत देण्यात आल्या असून सोलापूर पॅकेजचे कामही सुरू झाले आहे. सुरत आणि नाशिक दरम्यान काही पर्यावरणाची समस्या होती, तीही आता दूर झाली आहे.
दिल्ली ते चेन्नईचेही अंतरही होणार कमी..
या एक्सप्रेस – वेचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस दिल्ली ते चेन्नई हे अंतरही 320 किलोमीटरने कमी होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी निवडणूक राज्य मध्य प्रदेशमध्ये एक्सप्रेस वेच्या आणखी 244 किमी लांबीचे उद्घाटन केलं आहे . मध्य प्रदेशातून जाणारा 8 – लेन विभाग राजस्थान सीमेवरील नीमथूर गावापासून सुरू होतो आणि गुजरात सीमेवरील तिमरवानी गावाजवळ संपतो. यावेळी एक्सप्रेस वे गरोड, जाओरा, रतलाम आणि तांदला या शहरांमधून गेला आहे.
देशातला दुसरा लांब एक्सप्रेस – वे ही प्रागितिपथावर..
गडकरी म्हणाले की, सुरत आणि चेन्नई दरम्यान दुसरा सर्वात लांब एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. त्याचे काम जानेवारी 2023 मध्येच सुरू झाले असून त्याची एकूण किंमत सुमारे 45 हजार कोटी रुपये आहे, पायाभूत सुविधांचा विकास एका हातातून दुसर्या हातात हस्तांतरित करूनच वेगाने साधता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात रस्ते आणि महामार्ग बांधताना आम्ही इकोलॉजी आणि पर्यावरणाची विशेष काळजी घेत आहे.
प्लास्टिक आणि टायर – रबराचा वापर..!
गडकरी म्हणाले की, आत्तापर्यंत बांबूचे क्रॅश बॅरिअर्स आणि टायर मटेरियलचा वापर एक्स्प्रेस वेवर घसरण्यापासून वाचण्यासाठी केला जात आहे. टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून महामार्गाचा 703 किलोमीटरचा पट्टा तयार करण्यात आला आहे. आम्ही लवकरच असे धोरण आणण्याच्या तयारीत आहोत, ज्यामध्ये महापालिकेचा कचरा रस्ता बांधकामात वापरला जाईल. या संदर्भात, मंत्रालयाने यापूर्वीच शहरांभोवती 50 किलोमीटरच्या परिघात प्लास्टिक वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ज्या शहरांची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे, तेथे रस्ते बांधणीत टाकाऊ प्लास्टिकचा वापर करणे आवश्यक आहे..
डोंगरावर बनणार उत्कृष्ट रस्ते..
नितीन गडकरी म्हणाले की, डोंगराळ राज्यांमध्येही मजबूत रस्ते बांधले जातील आणि त्यासाठी परदेशी कंपन्यांना ऑफर दिली जाईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही चांगले रस्ते बांधण्याची तयारी सुरू आहे. परदेशी कंपन्यांचा सल्ला घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे आम्ही स्वीकारतो आणि हरित इंधन आणि सुरक्षितता यासारख्या मानकांची पूर्तता करताना पर्वतांमध्ये चांगले रस्ते तयार करणे हे आमचे प्राधान्य आहे. डोंगराळ राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी स्वित्झर्लंडमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात असून आम्ही पूर संरक्षणाशी संबंधित योजनेवर काम करत आहोत.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे चे खासियत..
दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्ग 1386 किमी लांबीचा आहे.
मध्य प्रदेशात 244 KM तयार आहे, सध्या 210 KM टोलने उघडले आहे.
2 ते 2.5 रुपये प्रति किमी दराने टोल टॅक्स भरावा लागत आहे.
एक्स्प्रेस वेचा एकूण खर्च – रु. 1 लाख कोटी
मध्यप्रदेशच्या झाबुआ – रतलाम – मंदसौर जिल्ह्यातून जात आहे.
सध्या 7 इंटरचेंज म्हणजेच प्रवेश-निर्गमन बिंदू आहेत.
दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास केलेल्या किलोमीटरनुसार टोल कापला जाईल.
दिल्ली ते मुंबई मार्च 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.