जमिनीच्या खातेधारकास किंवा संबंधित व्यक्तीला आपापल्या वेगळ्या प्रकारच्या हक्काच्या नोंदी सातबारावर फेरफाराच्या स्वरूपात घेण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे अर्ज करावे लागतात परंतु आता मात्र घरुनच अर्ज करता येणार आहेत. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने ‘ई – हक्क’ नावाची एक ऑनलाइन आज्ञावली विकसित केली आहे.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
या आज्ञावलीद्वारे संबंधितांना घरुनच फेरफार करण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ‘ई हक्क’ आज्ञावलीमध्ये नागरिकांना करावयाच्या अर्जाचे सहा प्रकार व बँकांनी करावयाच्या तीन प्रकारच्या अर्जाचा समावेश आहे.
नागरिकांना फेरफारसाठी करावयाच्या सहा प्रकारच्या अर्जामध्ये वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालककर्ताचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी, विश्वस्ताचे नाव कमी करणे, संगणीकृत सातबारामधील चुक दुरुस्त करण्याचा समावेश आहे.
बँकांनी करावयाच्या अर्जामध्ये ई – करार, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे याचा समावेश आहे. फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई- हक्क प्रणालीतून ऑनलाइन अर्ज सादर करता येतील अशा फेरफार प्रकारासाठी आवश्यक कागदपत्रे व साक्षांकित करून पीडिएफ स्वरुपात अपलोड करावी लागणार आहे.
दाखल केलेल्या अर्जाला नंबर व त्याची ऑनलाइन पोचदेखील अर्जदाराला मिळेल. या अर्जाची स्थिती प्रत्येक टप्यावर अर्जदारास तपासता येईल. प्रत्येक टप्यावर अर्ज स्वीकारला कारण देऊन परत पाठविला केला का नोटीस काढली का ? नोटीस बजाविण्यात आली का ? रुजू करण्यात आली का ? फेरफार मुदतीत हरकत आली का ? फेरफार मंजूर झाला का? ऑनलाइन सातबारा दुरुस्त झाला का? अशा प्रत्येक टप्यावर अर्जदाराच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होणार आहे.
ई-फेरफार डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
यामुळे शेतकऱ्याास घर बसल्या माहिती प्राप्त हाणार आहे. प्रत्यक लहानसहान कामासाठी तलाठी कार्यालयात जाण्याचा त्रास वाचणार आहे.
सातबारावरील नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज..
‘ई- हक्क प्रणाली’च्या माध्यमातून सातबारावरील नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज हा तलाठ्याच्या लॉगईनला जातो. त्यावर ते योग्य ती कार्यवाही करून ऑनलाइनच नोंद करतात. या पद्धतीने वारस नोंद, बोजा टाकणे, काढणे यासह सातबारावरील इतर नोंदी कमी करण्यासाठीही अर्ज करता येतो.
डिजिटल स्वाक्षरीतला नवा 7/12, 8A उतारा :- इथे क्लिक करा
यासाठी शासनाचे महाभूमी हे संकेतस्थळ असून यावर देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून सदरील प्रणालीतून सातबारावरील फेरफार ऑनलाइन करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
ई- हक्क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पूरक
तलाठ्यांना ई – फेरफारला जोडून फेरफारमध्ये रूपांतर करता येणार आहे. त्यासाठी ही प्रणाली ई – फेरफार त्या प्रणालीशी संलग्नित करण्यात आली आहे. फेरफारसाठी अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डाटा एंट्री करावी लागणार नाही . त्यामुळे तलाठ्यासाठीही ई- हक्क प्रणाली सहाय्यभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
फेरफार अर्ज प्रणाली – ई-हक्क :- ehakk.mahabhumi.gov.in
गावातील जमिनीचे चालू व्यवहार पाहण्यासाठी :- echawadi.gov.in
1. ई – चावडी प्रकल्पामध्ये तलाठी दप्तरातील गाव नमुने एक ते एकवीस मधील नमुने ऑनलाईन अद्यायाव करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
2. गाव नमुना 7/12, आठ – अ, सहा, सहा – अ सह – क, ई – फेरफार आज्ञावली मध्ये यापूर्वी ऑनलाईन करण्यात आल्याने ई – चावडी प्रकल्पामधून वगळण्यात आले आहे.
3. ई पिक पाहणी मधून गाव नमुना 11 (पिकांची आकडेवारी) आणि गाव नमुना 14 मधील शेतीचे पाणीपुरवठ्याची माहिती स्वयअदययावत होईल.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
4. गाव नमुना तेरा, गाव नमुना अठरा, गाव नमुना वीस गाव नमुना एकवीस हे चार नमुने रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
5. गाव नमुना 16 हा विविध शासन परिपत्रक, आदेश यांच्या बाबत असून यामध्ये तलाठी यांना सर्व प्रकारची परिपत्रके, शासन आदेश उपलब्ध होण्यासाठी सर्च इंजिन विकसित करून देण्यात येईल.
6. ई – चावडी प्रकल्पामध्ये गाव नमुना 7 ब विकसित करणे आवश्यक आहे. सदर नमुना हा अर्धन्यायीक कामकाजाचा असून त्याबाबत शासनाकडे नमुना विकसित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत गाव नमुना 7 ब हा उपलब्ध नोंदी करणेसाठी (OFFLINE कामकाज ) ई – चावडी प्रणालीत दाखवण्यात आला आहे.