राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु ! जेष्ठ नागरिकांना मिळतंय 3,000 रुपये अर्थसहाय्य; पहा पात्रता – कागदपत्रे, अन् अर्ज प्रोसेस..
राज्यातील 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
या योजनेंतर्गत आणि प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी 3 हजार रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात डीबीटीमार्फत जमा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची याच पद्धतीची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे; परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. मात्र, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात वयोश्री योजना राबवली जाणार असून , ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी शहरी भागासाठी आयुक्त यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही योजना कशी आहे आणि राज्यातील वयोवृद्धांना याचा कसा लाभ घेता येईल, तपशीलवार जाणून घेऊ..
असे आहेत योजनेच्या पात्रतेचे निकष..
लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (31-12-2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली) पात्र असतील.
65 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांकडे आधारकार्ड असणे किंवा आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा.
आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक..
आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळख दस्तावेज स्वीकारार्ह, सामाजिक सहाय्य जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत वा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
उत्पन्न मर्यादा :-
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक.
मागील तीन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्यप्राप्त केलेले नसावे
निवड / निश्चित केलेल्या जिल्ह्यात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.
या उपकरणाची खरेदी शक्य..
चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि- ब्रेस, लंबर बेल्ट सव्हायकल कॉलर.
केंद्र शासनाच्या कामिक्स विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण क्षेत्रात सहभागी होता येईल.
ही कागदपत्रे जोडणे आवश्यक
आधार कार्ड
मतदान कार्ड
बँक खात्याची माहिती (राष्ट्रीयकृत बँक)
स्वयं घोषणापत्र
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
शासनाने विहित केलेली अन्य कागदपत्रे
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (2)
लवकरच पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे शक्य
लवकरच अधिकृत वेबसाइट म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पोर्टल सुरू केले जाईल. या पोर्टलद्वारे पात्र ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतील. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर या योजनेचे स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.
अशी होणार अंमलबजावणी..
ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनिंग करण्यात येईल.
राज्यात 65 वर्षावरील एकूण नागरिक :
10 ते 12 टक्के (1.25 ते 1.50 कोटी)
वृद्धापकाळाने ग्रस्त, मानसिक अस्वस्थाने ग्रस्त 12.5 ते 15 लाख.