दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा आणि पाणीपातळीत होत असलेली घट याचे गांभीर्य पाहता शेतकरीही पुर्वनियोजन करुन शेती व्यावसायावर भर देऊ लागला आहे. 2018 ते जून 2024 पर्यंत लातूर जिल्ह्यातील 282 गावांचा पोखरा योजनेत समावेश होता. या दरम्यानच्या काळात 49 हजार 473 शेतकऱ्यांनी या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेतला आहे. मात्र, पसंती दिली आहे ती तुषार सिंचनाला..
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत पोखरा योजना राबवली जात आहे. सुरुवातीच्या काळात राज्यातील 15 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये लातूर जिल्ह्याचा देखील समावेश झालेला आहे. मधूमक्षिका पालनापासून वेगवेगळ्या 22 घटकांचा यामध्ये समावेश आहे अधिकच्या अनुदानावर योजनेचा लाभ ही पोखराची खरी ओळख राहिलेली आहे.
त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील 49 हजार 473 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ तर घेतलाच पण याकरिता तब्बल 143 कोटी 88 लाख 97 हजार रुपये सरकारने खर्ची केलेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी 60 हजार 624 जणांनी नोंदणी केली होती. यापैकी 58 हजार 951 अर्जांना पुर्वसंमती देण्यात आली तर 49 हजार 473 शेतकरी हे लाभार्थी ठरलेले आहेत.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. ठिंबक सिंचन, फळबाग लागवड, बिजोत्पादन, तुषारसिंचन, पंपसंच यासारखे घटक अनुदानावर घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे जून 2024 पर्यंत योजनेचा पहिला टप्पा पार करणे कृषी विभागाला अनिवार्य असणार आहे.
पूर्वसंमती मिळूनही जिल्हयातील 236 प्रकरणे ही प्रलंबित राहिलेली आहेत शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणी यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम अडकलेली आहे.
असे ठरतात लाभार्थी..
पोखरा योजनचे वेगवेगळे टप्पे शासनाने ठरवून दिले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 282 गावातील शेतकरी हे पहिल्या टप्प्यात लाभार्थी ठरले आहेत. 2 हेक्टरपर्यंत लाभ घेतल्यास 75 टक्के अनुदान तर 2 ते 5 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरील लाभार्थी असतील तर 65 टक्के अनुदान हे ठरवून देण्यात आले आहे.
सिंचनावर शेतकऱ्यांचा भर शेतीक्षेत्र सिंचनाखाली येईल त्याच अनुषंगाने शेतकरीही योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
प्रकल्पासंबंधी व विविध घटकांबाबत अधिक माहितीसाठी 9355056066 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा..
ठिबक सिंचनाचा लाभ 6 हजार 530 शेतकऱ्यांनी घेतला असून याकरिता 48 कोटी 8 लाख रुपये अनुदनावर अदा करावे लागले आहेत. तुषार सिंचनासाठी 24 हजार 640 शेतकरी पात्र झाले होते. यावर शासनाने 47 कोटी 71 लाख रुपये खर्ची केले आहेत.
पोखरा अंतर्गत येणाऱ्या गावांची यादी पहा :- mahapocra.gov.in
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करा, लिंक :- dbt.mahapocra.gov.in
पोखरा योजनेत मंजुरी आणि अनुदानाचा थेट लाभ यामुळे शेतकऱ्यांचा ओढा होता. पहिला टप्पा जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. काही शेतकऱ्यांची प्रलंबित राहिलेली प्रकरणे ही मार्चपर्यंत निकाली काढली जाणार आहेत. पोखरामुळे सिंचनाचे घटक शेतकऱ्यांकडे वाढले आहेत.
– दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर..
कोणत्या शेती योजनांसाठी मिळतो लाभ क्लिक करा :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Pocra)