शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : आयकर रिटर्न भरणे असो किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम असो, पॅनकार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. गुंतवणुकीसारख्या गोष्टींसाठीही त्याचा वापर होतो. पॅन कार्ड क्रमांकामध्ये व्यक्तीचा कर आणि गुंतवणूक संबंधित डेटा असतो. तुमचं पॅन कार्ड हरवल्यास तुम्ही तुमचं काम ई-पॅन कार्डद्वारेही चालवू शकता…
ई-पॅन कार्ड (e-PAN card) म्हणजे काय ?
तुम्ही ई-पॅन कार्डला डिजिटल किंवा ऑनलाइन पॅन कार्ड देखील म्हणू शकता. हे तुमच्या पॅन कार्डचे व्हर्चुअल रूप आहे. ई-पॅन हे पॅन कार्डच्या फिजिकल कॉपी बरेच चांगलं आहे. ते हरवण्याचाही धोका नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फिजिकल पॅन कार्डप्रमाणे वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही काही मिनिटांत ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घ्या…
ई-पॅन कार्ड कसं कराल डाउनलोड ?
1. सर्वप्रथम, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या ‘Download e-pan’ ऑप्शनवर जावं लागेल.
त्याची लिंक: https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
2. येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
3. त्यानंतर, आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
4. ते तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकण्यास सांगेल. त्यानंतर, अटी व शर्ती स्वीकारा.
5. एकदा तुम्ही अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर टॅप करा.
6. त्यानंतर, एक पेमेंट पर्याय उघडेल. येथे तुम्हाला ₹8.26 भरावे लागतील, जे तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे अदा करू शकता…
7. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड (e-PAN card) डाउनलोड करू शकता…
पॅन कार्डची PDF फाइल पासवर्ड संरक्षित असेल. त्याचा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.