Take a fresh look at your lifestyle.

अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा ! E-Peek Pahani ची अट तात्पुरती रद्द, तात्काळ मिळणार मोबदला ; ‘या’ पद्धतीने होणार पाहणी

0

शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची (E-Peek Pahani) अट तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.

विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यावेळी तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्याचं निदर्शनास आणून देत, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. या प्रक्रियेत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

ग्रामीण भागात कित्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल अँप वरून ई-पिक पाहणीचा (E-Peek Pahani) अहवाल पाठविण्यासाठी सोय नाही त्यामुळे बरेच शेतकरी ई-पिक पाहणी अहवाल पाठवण्यापासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून ई-पिक पाहणीची रद्द करणी अशी मागणी करण्यात आली होती तसेच ई-पिक पाहणीविना पिक विमा नुकसान भरपाई मिळणे शक्य झाले नसते. आता तात्पुरती का होईना ई-पीक पाहणीची अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पीक विमा योजनेतही होणार अमूलाग्र बदल 

यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे.

शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.