7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी Good News, पगारात होणार 49,420 रुपयांची वाढ; पहा डिटेल्स
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला आहे. त्यांना 38% दराने मोबदला मिळत आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये (Fitment factor) वाढ करण्याच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. आता केंद्र सरकार याकडे लक्ष दिलं आहे. 7th CPC च्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा विचार सुरू आहे.
तसं पाहिलं तर, केंद्र सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांना नाराज करायचं नाहीये. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी पर्यायांचा विचार केला जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DA नंतर आता फिटमेंट फॅक्टर वाढवला जाणार आहे. सध्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 पट निश्चित करण्यात आला आहे. तो 3.68 पट ठेवावा, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी होती. असं झालं असतं तर किमान वेतन 26,000 रुपये झालं असतं. पण, आता ते वाढवून 3 पट करण्यावर सहमती होणार असल्याची नवी चर्चा आहे. मात्र, याबाबतचा निर्णय पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पानंतरच घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
किती वाढू शकतो पगार ? उदाहरांसह पहा…
जर फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळता त्याचा पगार 18,000 X 2.57 = 46,260 रुपये होऊ शकतो. शिफारशींनुसार ही कमाल मानली गेल्यास, पगार 3.68 पट वाढवल्यास 26000 X 3.68 = 95,680 रुपये होऊ शकतो. यामध्ये कर्मचाऱ्यांना बंपर फायदा होणार आहे. त्याच वेळी, फिटमेंट फॅक्टरच्या 3 पट असल्यास, पगार 21000X3 = 63,000 रुपये होईल.
फिटमेंट फॅक्टरमुळे ठरतो पगार
केंद्रीय कर्मचार्यांचे पगार (CG Employees Salary) ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट घटकाद्वारे निर्धारित केलं जातं. हाच घटक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढतो.
Fitment Factor मुळे नेमकं काय होतं ?
7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचार्यांचे पगार निश्चित करताना, मूळ पगारासह महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) 7 व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 चा गुणाकार करून मोजलं जातं.
DA मध्ये झाली 4 टक्क्यांनी वाढ
सरकार वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी महागाईची सरासरी काढते, ज्यामध्ये ती जानेवारी ते जूनपर्यंत मोजली जाते. यानंतर, दुसऱ्या सहामाहीसाठी चलनवाढीची सरासरी काढली जाते. या आधारावर DA मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. DA नेहमी सरासरी महागाईपेक्षा जास्त असतो. जुलै 2022 पर्यंतच्या कालावधीसाठी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवून 38% करण्यात आला आहे. DA वाढल्यानंतर त्याच आधारावर TA वाढवला जातो. DA मधील वाढ देखील TA शी जोडलेली आहे. त्याचप्रमाणे एचआरए (HRA) आणि मेडिकल रीम्बर्समेंट देखील निश्चित केली जाते. जेव्हा सर्व भत्ते मोजले जातात, तेव्हा केंद्रीय कर्मचार्यांचे मासिक CTC निश्चित केलं जाते.
पीएफ (PF), ग्रॅच्युइटीचे (Gratuity) योगदान
सर्व भत्ते आणि पगार निश्चित झाल्यानंतर, आता मासिक भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅच्युइटी योगदानावर येतो. पीएफ आणि ग्रॅच्युईटीचे योगदान मूळ वेतन आणि DA शी जोडलेलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्याचा पीएफ आणि ग्रॅच्युइटी त्याच्या सूत्रानुसार ठरते. जेव्हा CTC मधून सर्व भत्ते आणि कपात केली जातात, तेव्हा केंद्रीय कर्मचार्यांचा टेक होम पगार निश्चित केला जातो.