कामाची बातमी : LIC पॉलिसीधारकांना आता तात्काळ मिळणार 5 लाखांचं कर्ज ; पहा ऑनलाईन प्रोसेस अन् EMI कॅल्क्युलेशन
जर तुम्ही महागाईच्या युगात आणि स्वस्त व्याजदरांसह कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांना एक मोठी संधी देत आहे. एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसींवर कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा दिली आहे.
तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असल्यास, तुम्ही एलआयसी पॉलिसीवर वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. या प्रकारच्या वैयक्तिक कर्जावर सरकारी आणि खाजगी बँकांच्या तुलनेत खूपच कमी व्याजदर असतो. पॉलिसीवर LIC द्वारे ऑफर केलेल्या वैयक्तिक कर्जाचा व्याज दर 9 टक्क्यांपासून सुरू होतो. परंतु, तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
पॉलिसीवर तुम्ही घेऊ शकता वैयक्तिक कर्ज
पॉलिसीवर घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी आहे. सध्या, त्याचा व्याजदर 9 टक्क्यांपासून सुरू होतो आणि कर्जाची मुदत 5 वर्षापर्यंत आहे. LIC द्वारे उपलब्ध पर्सनल लोनची (Personal Loan) खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही कर्जाच्या मुदतीपूर्वी पेमेंट केलं तर शुल्क शून्य आहे. म्हणजेच, मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास, नंतर वेगळे शुल्क भरावे लागणार नाही.
किती भरावा लागेल EMI :-
EMI बद्दल बोलायचचं झाल्यास, जर एखाद्या व्यक्तीने 9% दराने 1 लाख रुपयांचे कर्ज घेतलं असेल आणि 1 वर्षाचा कालावधी निश्चित केला असेल, तर 8745 रुपयांचा EMI लागू होईल. जर कर्ज 2 वर्षांसाठी घेतले असेल तर EMI 4568 रुपये असेल. दुसरीकडे, 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, EMI रक्कम 2076 रुपये असेल.
5 लाखांच्या कर्जावर किती होईल EMI :-
जर तुम्ही 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतलं आणि एक वर्षासाठी परतफेड असेल तर EMI रक्कम 44191 रुपये असेल. 2 वर्षांच्या कालावधीसाठी 23304 रुपये EMI असेल. 3 वर्षांसाठी 18472 रुपये, 4 वर्षांसाठी 15000 आणि 5 वर्षांसाठी 12917 रुपये.
Loan साठी कसे करू शकता अप्लाय :-
जर तुम्हाला एलआयसी (LIC) पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल, तर तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन https://licindia.in/Home/Policy-Loan-Options अधिक माहिती मिळवू शकता.
तेथे तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन फॉर्म भरा आणि डाउनलोड करा. भरलेल्या फॉर्मवर स्वाक्षरी केल्यानंतर, तो स्कॅन करा आणि एलआयसीच्या वेबसाइटवर (LIC) अपलोड करा.
यानंतर तुमच्या अर्जाची विमा महामंडळाकडून पडताळणी केली जाईल आणि कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या विमा सल्लागाराशी संपर्क करू शकता…