राज्यात वर्षभरात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ‘ई- पीक पाहणी’ ॲपद्वारे सुमारे 63 टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. त्यानुसार 80 लाख 81 हजार 215 हेक्टर क्षेत्रापैकी 51 लाख 58 हजार 791 हेक्टरवर पीक पाहणी झाली आहे.

दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी सुरू असून, खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे.

ही नोंदणी ई – पीक पाहणी ॲपद्वारे सहज करण्यात येत आहे. त्यानुसार सन 2023-24 या वर्षांसाठी महसूल विभागाने केलेल्या ई – पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक सोयाबीन या पिकाची नोंदणी केली असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ‘ई – पीक पाहणी’ ची नोंद प्रत्येक वर्षी करणे बंधनकारक केली आहे.

त्यानुसार प्रत्येक शेतकरी आणि तलाठी यांच्या स्तरावर नोंदणीला वेग आला आहे. राज्यात ई – पीक पाहणी ॲपद्वारे सध्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी महसूल विभागनिहाय सुरू आहे, तर खरीप हंगमातील पिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे..

E-Peek Pahani स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहण्यासाठी 

  इथे क्लिक करा  

Google Play Store वरून E-Pik Pahni अँप डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN&gl=US

E-Peek Pahani मध्ये पिकाची नोंद करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप तक्ता पहा.. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *