शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021:- शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शारीरिक विकासात अडथळा येतो. तर दुसरीकडे लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्तपेशींची (Blood cells) निर्मिती कमी होते. त्यामुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा, सुस्ती जाणवते. याशिवाय इतर अनेक समस्यांना बळी पडण्याचा धोका वाढतो. अशा वेळी त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्याची कमतरता पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर जाणून घेऊयात लोहाच्या कमतरतेची लक्षणे आणि ती पूर्ण करण्यासाठी रोजच्या काय खायला हवं…
लोहाच्या (Hemoglobin) कमतरतेची लक्षणे :-
दिवसभर थकवा, अशक्तपणा
अनियमित किंवा (Heavy) मासिक पाळी
छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण
डोकेदुखी आणि चक्कर येणे
हात पाय थंड पडणे
या लोकांमध्ये जाणवते लोहाची कमतरता :-
तसं पाहिलं तर, शरीरात लोहाची कमतरता असणे सामान्य आहे. परंतु ही समस्या अधिकतर लहान मुलं आणि महिलांमध्ये दिसून येते. विशेषतः गरोदर, ज्यांना मासिक पाळी येते. याशिवाय ज्यांची रजोनिवृत्तीची (Menopause) स्थिती येणार आहे. तसं, लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक सप्लिमेंट्स मेडिकल मध्ये सहज उपलब्ध आहेत. पण रोजच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून तुम्ही त्याची कमतरता भरून काढू शकता. जाणून घेऊया त्याच्याबद्दल…
आवळा :-
आवळा हा व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहाचा मुख्य स्त्रोत आहे. शरीरातील लोहाची कमतरता याच्या सेवनाने पूर्ण होते. याशिवाय, रोगप्रतिकारशक्ती वाढवून, रोगांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही ते कच्चे, लोणचे, कँडी, मुरंबा किंवा चूर्ण स्वरूपात तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता.
गूळ :-
शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही गुळाचं सेवन करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला लोहासोबतच इतर आवश्यक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मिळतील. अशा परिस्थितीत शरीरातील रक्ताची कमतरता दूर झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा प्रकारे तुम्ही आजारांपासून सुरक्षित राहाल. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात साखरेच्या जागी गुळाचा समावेश करू शकता.
चवळी :-
चवळी हा लोहाचा मुख्य स्त्रोत आहे. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होऊ शकते. चवळीमध्ये 26 ते 29 % लोह असतं. अशा स्थितीत शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात चवळीचा समावेश करू शकता.
मनुका :-
- मनुक्यामध्ये भरपूर लोह असतं. यासोबतच यात तांबे, व्हिटॅमिन – ए, अँटी-ऑक्सिडेंट आणि औषधी गुणधर्म असतात. याच्या सेवनामुळे शरीरात रक्त लवकर तयार होतं. याशिवाय मनुका खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्था निरोगी राहते. थकवा, अशक्तपणा निघून जातो आणि दिवसभर उत्साही वाटतं. यासाठी 8-10 मनुके रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे लोहाची कमतरता पूर्ण होण्यास आणि शारीरिक आणि मानसिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल.
पालक :-
पालकामध्ये लोह, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून दोनदा पालक खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते. याशिवाय मानसिक आणि शारीरिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने होतो.
मांस :-
तुम्ही जर मांसाहारी असाल तर लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही मांसाहार करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होईल. यासोबतच यकृत, किडनी, मेंदू, हृदय हे अवयवही निरोगी राहतील.