Take a fresh look at your lifestyle.

Share Market : या 5 शेयर्सनी फक्त 5 चं दिवसांत दिला 91 % नफा ; जाणून घ्या…

0

महाअपडेट टीम 19 डिसेंबर 2021:- गेल्या आठवड्यात शेअर बाजाराबद्दल पाहिलं तर गुंतवणूक दारांना मोठा फटका बसला आहे. 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांनी मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने घेतलेली कठोर भूमिका, बँक ऑफ इंग्लंडने अचानक केलेली दरवाढ, ओमिक्रॉनवरील वाढती चिंता आणि परदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

आयटी (IT) वगळता सर्व क्षेत्र घसरले, ज्यामध्ये रिअल्टी 8% पेक्षा जास्त घसरली. ऑटो, बँका, वित्तीय सेवा, एफएमसीजी, इन्फ्रा आणि मेटल 3-5 टक्क्यांनी घसरले. आयटी निर्देशांक 2 टक्क्यांनी वधारला. BSE सेन्सेक्स 1,775 अंकांनी घसरून 57,012 वर बंद झाला आणि निफ्टी 50 526 अंकांनी घसरून 17,000 अंकांनी खाली 16,985.20 वर बंद झाला.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 4.5 % आणि 2.75% घसरले. पण एवढी मोठी घसरण होऊनही अशे 5 शेअर्स होते, त्यामध्ये 91 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

हिंदुस्थान फ्लोरोकार्बन (Hindustan fluorocarbon) :-

हिंदुस्तान फ्लोरोकार्बन्स ही स्मॉल-कॅप कंपनी आहे. त्याची मार्केट कॅप सध्या 38 कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यातील 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर 91.22 टक्क्यांनी वधारला. 5 दिवसात स्टॉक 10.14 रुपयांवरून 19.39 रुपयांपर्यंत वाढला. शुक्रवारी तो सुमारे 10 टक्क्यांच्या वाढीसह 19.39 रुपयांवर बंद झाला. 91.22 % रिटर्न्स सह, गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे 1.91 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

सुरत टेक्सटाईल (Surat Textile) :-

सुरत टेक्सटाईलनेही गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. या कंपनीचा शेअर 9.64 रुपयांवरून 18.40 रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्समधून 90.87 % रिटर्न्स मिळाले . या कंपनीचे मार्केट कॅप 408.53 कोटी रुपये आहे. 5 दिवसात 90.87% रिटर्न्स हा FD सारख्या पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि चांगला आहे. शुक्रवारी हा शेअर सुमारे 10 % वाढून 18.40 रुपयांवर बंद झाला.

जिसकोल एलॉयज (Jiscol Alloys) :-

रिटर्न्स देण्याच्या बाबतीतही जोसेल अलॉयज (Jiscol Alloys) खूप पुढे होता. गेल्या आठवड्यात शेयर्सने 90.13% रिटर्न्स दिला. त्याचा शेअर 2.33 रुपयांवरून 4.43 रुपयांवर गेला. म्हणजेच या शेयर्समधून गुंतवणूकदारांना 90.13% रिटर्न्स मिळाला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 70.12 कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर 10 % वाढून 4.43 रुपयांवर बंद झाला.

अल्फालॉजिक टेकसिस (Alphalogic Texis)

अल्फालॉजिक टेकसिसमधून गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांनी लक्षणीय नफा कमावला. त्याचा स्टॉक 25.10 रुपयांवरून 46.95 रुपयांवर गेला. या शेयर्समधून गुंतवणूकदारांना 87.05% रिटर्न्स मिळाला. या कंपनीचे मार्केट कॅप रु.94.80 कोटी आहे. शुक्रवारी हा शेअर 3.76 टक्क्यांनी वाढून 46.95 रुपयांवर बंद झाला.

जूनकटोली टी (Junakatoli tea) :-

जूनकटोली च्या टी – नेही गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांची झोळी भरली. त्याचा शेअर 117.25 रुपयांवरून 214 रुपयांवर गेला. म्हणजेच या शेयर्समधून गुंतवणूकदारांना 82.52 % रिटर्न्स मिळाले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 21.49 कोटी रुपये आहे. शुक्रवारी, शेअर सुमारे 7.13 टक्क्यांच्या वाढीसह 214 रुपयांवर बंद झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.