Post Office ची शानदार स्कीम ; तुम्हाला मिळतील 16 लाख रु. प्रत्येक महिन्याला भरावे लागतील ‘इतके’ पैसे !
शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021:- पोस्ट ऑफिस अनेक गुंतवणूक योजना ऑफर करते, जे गरजूंसाठी सुरक्षित आणि उत्तम आहेत. ज्यांना पैसे देऊन धोका पत्करायचा नसेल तर त्यांच्यासाठी या योजना सर्वोत्तम मानल्या जातात.
पोस्ट ऑफिस द्वारे ऑफर केलेल्या अनेक योजना आहेत ज्या छोटी गुंतवणुक करून हाय रिटर्न्स देतात. अशीच एक योजना जी तुम्हाला शानदार रिटर्न्स मिळविण्यात मदत करते ती म्हणजे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते (RD deposit) ही लहान हप्त्यांवर चांगला व्याजदर मिळविण्यासाठी सरकारी हमी योजना आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घ्या.
काय आहे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना :-
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना केवळ सुरक्षित नाही, तर तुम्ही या योजनेत दरमहा केवळ 100 रुपये गुंतवून करून मोठी कमाई करू शकता. तसेच येथे गुंतवलेल्या रकमेवर कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येऊ शकते.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना व्याज दर :-
तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये किमान 5 वर्षांसाठी आरडी (RD) खाते उघडावं लागेल. प्रत्येक तिमाहीत (At annual rate), ठेवीवर व्याज मोजलं जातं. त्यानंतर प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह ते तुमच्या खात्यात जोडलं जातं.
इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या आरडी स्कीमवर (RD) 5.8 % व्याज दिलं जात आहे. हा नवीन दर 1 जुलै 2020 पासून लागू होणार आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर जाहीर करते.
तुम्हाला 16 लाख रु कसे मिळतील ?
तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी (RD) स्कीममध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास, तेही 10 वर्षांसाठी, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर रु.16.28 लाख मिळतील. एक गोष्ट लक्षात घ्या की, जर तुम्ही (RD) आरडीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्याला उशीर केल्यास दरमहा एक टक्का दंड आकारला जातो.