Take a fresh look at your lifestyle.

Share Market : ‘या’ शेयर्सने 1 लाखांचे वर्षभरात केले तब्बल 20 लाख रु. ; तुमच्याकडं आहे का ‘हा’ शेयर ?

0

शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021:- गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती अन् आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह बंद झाला.पण एक स्टॉक असा होता ज्याने या घसरत्या दिवशीही मोठी कमाई केली.

दुसरीकडे, या स्टॉकची एक वर्षाची कमाई पाहिली, तर ती 2000% आहे. म्हणजेच, जर कोणी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याने भरपूर कमाई केली आहे.आता आपण या शेयर्स बद्दल जाणून घेणार आहोत…

कॉस्मो फेराइट्स लिमिटेड (Cosmo Ferrites Ltd) :-

कॉस्मो फेराइट्स लिमिटेडच्या (Cosmo Ferrites Ltd) शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे कमावले आहेत. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला या शेयर्सला पेनी स्टॉक (Penny stock) म्हटलं जात होतं . त्यावेळी या शेअरची किंमत सुमारे फक्त 12 रुपये होती परंतु हा पेनी स्टॉक (Penny stock) 2021 मध्ये खरोखरच मल्टीबॅगर स्टॉक असल्याचं सिद्ध झालं आहे.

Cosmo Ferrites च्या स्टॉकने एका वर्षात 2000% हुन अधिक कमाई केली आहे. 2021 च्या सुरुवातीला या स्टॉकची किंमत सुमारे 12 रुपये होती.परंतु आता या शेअरची किंमत 244.20 रुपये आहे. अशा प्रकारे, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान कॉस्मो फेराइट्सचा शेयर्स 2000% अधिक वाढला आहे. जर तुम्हाला अजूनही दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर करू शकता.

Cosmo Ferrites च्या शेअरने दिले मोठे रिटर्न्स :-

कॉस्मो फेराइट्सचा शेअर एका महिन्यातच 225.70 रुपयांवरून 244 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या स्टॉकने 1 महिन्यात सुमारे 7% रिटर्न्स दिला आहे.

या शेअरचा दर गेल्या 6 महिन्यांत 28.30 रुपयांवरून 244 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत सुमारे 750% रिटर्न्स दिला आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये या शेअरची किंमत सुमारे 12 रुपये होती, जी आता 244 रुपये झाली आहे. अशा प्रकारे, याच कॅलेंडर वर्षातच या शेयर्सने गुंतवणूकदारांचे पैसे 20 पटीने जास्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.