Edible Oil Rate : गृहिणींना दिलासा, खाद्यतेलाच्या दरांत लीटरमागे 60 ते 70 रुपयांची घसरण, पहा 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर..

0

एकीकडे पेट्रोल व घरगुती गॅसच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या खाद्यतेलांच्या दरात काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील सहा महिन्यांमध्ये खाद्यतेलांचे दर सध्या 20 टक्के कमी झाले आहेत. खाद्यतेलांच्या दरात घट झाल्याने गृहिणींकडून समाधान व्यक्त होत आहे. तर पेट्रोल व गॅससह डाळींचे दर नियंत्रित आणावेत, अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे.

सध्या पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान देशांसह अनेक युरोपीयन देशांमध्ये महागाईचा निर्देशांक गगनाला भिडला आहे. तसेच आपल्याकडेही तुलनेने महागाई वेगाने वाढत चालली आहे. महागाईचा परिणाम सर्वसामान्यांवर थेट होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असतानाच उत्पन्नाचे स्रोत घटत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.यामुळे महागाईचा संबंध थेट लोकांच्या जगण्याशी भिडतो.

महागाईच्या काळात स्वयंपाकघरात खाद्यतेलांच्या दरात काही प्रमाणात घट झाल्याने गृहिणींना थोड्यासा दिसाला मिळाला आहे. प्रत्येक पदार्थांच्या फोडणीसाठी आणि तळणीसाठी तेल लागत असल्याने तेल हा स्वयंपाक घरातला महत्वाचा घटक मानला जातो.

सोयाबीन, सरकी, सूर्यफूल, शेंगदाणा खाद्यतेलांचे काहीसे उतरले आहेत. खाद्यतेलांच्या किंमती महिन्यांपासून टप्प्याटण्याने उतरत असल्यामुळे गृहिणींमधुन समाधान व्यक्त होत आहे.

खाद्यतेलांच्या दरात इतकी झाली घट..

6 महिन्यापूर्वी सरकी तेलाचा डबा (15 लीटर) 2 हजार 30 रुपयांना मिळत होता. आता हाच डबा 1700 रुपयाना ग्राहकांना मिळत आहे. जेमिनी तेलाचा डबा 2 हजार 400 रुपयांना होता, तो दर 1 हजार 810 इतका कमी झाला आहे. तसेच सनी सनफ्लॉवर तेलाचा डबा 2 हजार 300 रुपयांना होता, त्याची आता किंमत 1 हजार 750 झाली आहे.

सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी आवश्यक वस्तू आणि सेवांचे दर हे माफकच असावेत; कारण वाढत्या महागाईत संसार चालवताना गृहिणींनाच काटकसर करावी लागते. त्यातच रोज आवश्यक असणाऱ्या खाद्यतेले, धान्ये, कडधान्ये, गॅस, भाजीपाला सगळ्याचेच दर वाढल्याने त्रास होत होता. खाद्यतेलांचे दर उतरत आहेत. त्याप्रमाणेच गॅस व डाळींचे दरही कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे.
अनुप्रिया दूस, गृहिणी .

गेल्या सहा महिन्यांपासून तेलांचे दर टप्प्याटप्प्याने कमी झाले आहेत. त्याआधी ऐन सणासुदीत खाद्यतेलांचे दर भडकल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत होता. पण आता तेलाचे दर कमी झाल्याने ग्राहकाकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच व्यापान्यांमध्ये देखील समाधान आहे.
मुकेश न्याती , तेलाचे व्यापारी

Leave A Reply

Your email address will not be published.