पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस वे : 4 महिन्यांत भूसंपादन होणार पूर्ण, ‘हा’ पॅटर्न राबवला जाणार, जमीनदारांना ‘इतका’ मिळणार मोबदला..

0

औरंगाबाद ते पुणे या महामार्गासाठी प्राथमिक अधिसूचना निघाली असून पुण्याला समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील २४ गावांतून जाणार आहे. या मार्गासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे असे प्रशासनाचे धोरण आहे. 

या नव्या महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून समृद्धी महामार्गाच्या पॅटर्ननुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात खास यासाठी 14 डिसेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक झाली.

जिल्ह्यातल्या 24 गावांना होणार फायदा.

औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना 3 (ए) निघाली असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील सात गावांचा समावेश आहे. तर पैठण तालुक्यातील 17 गावातून हा मार्ग जात आहे. भारतमाला फेज 2 मधील ग्रीन फील्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित असल्याने यामुळे या २४ गावांना याचा मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे.

औरंगाबाद तालुका :- पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन या गावांतून हा मार्ग जाणार आहे.

पैठण तालुका :- वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, कारंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पोटगाव, सायगाव आणि पैठण परिसरातून हा रस्ता जाणार आहे.

औरंगाबाद पुणे महामार्गासाठी कोणत्या प्रकारे भूसंपादन करायचे हे अद्याप ठरलेले नसले तरी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे भूसंपादन व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 112 गावातून समृद्धी महामार्ग गेला आहे या गावांतील जमिनीच्या भूसंपादनापोटी सुमारे 1100 कोटी रुपये जमीन मालकांना देण्यात आले आहेत.

येत्या चार महिन्यांत या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे समन्वयाची भूमिका पार पडणारआहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करीत बुधवारच्या बैठकीला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी नाडे यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन आणि एमएसआरडीसी मध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इथे क्लिक करून वाचा :- जमीन भूसंपादनात गेल्यास किती पट मिळतात पैसे ? काय आहेत नियम, पहा, कोणत्या जमिनीला कसा मिळतो रेट ?

यापुढे हा दुरावा वाढल्यास भूसंपादन प्रक्रिया लांबण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. भूसंपादन प्रक्रियेशी निगडित सर्व घटकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते दुसरीकडे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया कडेही स्वतंत्र भूसंपादन अधिकारी आहेत. जिल्हा प्रशासन एमएसआरडीसी आणि एनएचआय या तीन यंत्रणा भूसंपादन प्रक्रियेत सहभागी असणार आहेत.

इथे क्लिक करून वाचा :- जमीनदारांचा संभ्रम झाला दूर, Revise Proposal – Alignment-3 चा एकत्रित पहा रोडमॅप..

समृद्धी महामार्गाप्रमाणे मिळणार मोबदला ? 

समृद्धी महामार्गासाठी सुरुवातीला लँड पुलिंग सिस्टम नुसार भूसंपादन करण्याचा निर्णय झाला होता. परंतु जमीन मालकांनी या पद्धतीच्या भूसंपादनाला आपला विरोध दर्शवला. त्यानंतर झालेल्या वाटाघाटीतून रेडीरेकनर दाराच्या पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व त्याच प्रमाणे समृद्धी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पार पडली गेली. याच धर्तीवर औरंगाबाद ते पुणे महामार्गासाठी भूसंपादन व्हावे यासाठी एमएसआरडीसी कडे सध्या समन्वयाची जबाबदारी दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.