Maruti च्या या SUV ची कमाल ! बुकिंग पोहचलं 56 हजारांवर, 28Km पर्यंत मायलेज, 6 एयरबॅग, 9 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड..
क्रेटा आणि सेल्टोसलाही मागे टाकून त्यांच्यापुढे मारुती ग्रँड विटाराने मोठं आव्हान निर्माण केलं आहे. ही SUV भारतात येताच इतकी लोकप्रिय झाली आहे की ग्राहकांमध्ये तिची मागणी सातत्याने वाढत असून SUV चे बुकिंग सातत्याने वाढत आहे. त्याचे बुकिंग नुकतेच सप्टेंबरमध्ये सुरू झालं होतं आणि आतापर्यंत या SUV 56,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.
मारुती ग्रँड विटाराच्या विविध व्हेरियंटमध्ये सर्वाधिक मागणी हायब्रीड व्हेरियंटला आहे आणि 35 टक्के मागणी या व्हेरियंटला आहे. या वाहनासाठी सध्या 2-9 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड देण्यात आला आहे. नोएडा आणि गाझियाबादमधील ग्रँड विटाराचा व्हेटिंग पिरियड 9 महिन्यांचा दिला आहे.
28Kmpl मायलेज
इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन ग्रँड विटारा 1.5-लीटर TNGA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 91bhp पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, यामध्ये इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड नावाची मजबूत-हायब्रिड मोटर आहे, जी 114Bhp पॉवर आणि 141Nm टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट्सशी जोडलेलं आहे.
तसेच, ऑलग्रिप AWD सिस्टीम मॅन्युअल व्हर्जनसह ऑफर केली जात आहे. हे ECVT युनिटशी जोडलेलं आहे, जे 27.97 KMPL चे मायलेज देते. या मायलेजसह, ती त्या विभागातील सर्वात इंधन कार्यक्षम SUV बनली आहे.
सेफ्टी फीचर्स
ग्रँड विटारामध्येही सेफ्टीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखी अनेक फीचर्स दिली आहेत.
याशिवाय वाहनाच्या सर्व टायर्समधील हवेच्या प्रमाणाचीही माहिती उपलब्ध आहे आणि ही माहिती तुम्ही कारमध्ये बसवलेल्या स्क्रीनवरही पाहू शकता..