शासनाचा 800 कोटींचा निधी मंजूर ! ‘या’ जिल्ह्यांत 40,272 डीपी लागणार, पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस अन् जिल्हानिहाय लाभार्थी तक्ता..
राज्यात महावितरण कंपनीमार्फत कृषीपंप वीज जोडणी धोरण – 2020′ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक वर्षी योजना कालावधीत घेण्यात येणाऱ्या रू. 1500 कोटी पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे. सन 2022-23 या वर्षाकरिताच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून महावितरण कंपनीस रू. 349.41 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामधून नवीन वीज जोडणीकरिता पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
आता सन 2023-24 या वर्षाकरिताच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सन 2024 या वर्षाकरिता सर्वसाधारण वर्गवारीतील सुमारे 40,272 प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.1387.77 कोटी भागभांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील सर्वसाधारण वर्गवारीतील कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरीता येणाऱ्या खर्चाकरीता सन 2023-24 करिता अर्थसंकल्पित केलेल्या रु. 1000.00 कोटी रक्कमेपैकी रु. 800 कोटी रुपये रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात आली आहे.
या एक शेतकरी एक DP योजनेअंतर्गत (HDVS) वितरण प्रणालीद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटप डीपीचे वाटप करण्यात आले होते. परंतु मार्च 2021 पर्यंत वेटिंग असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील डीपीचे ट्रांसफार्मर वितरण करण्यात आलेले नव्हते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी DP साठी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
परंतु, त्यांना या या योजनेचा लाभ मिळेल की नाही ? प्रश्न पडला होता. परंतु आता त्यांनाही या योजनेअंतर्गत अर्ज केलेले लाखो शेतकरी आज देखील (HDVS) जोडणीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहा जिल्हानिहाय लाभार्थी तक्ता..
शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
HDVS नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..
आधार कार्ड
मोबाइल नंबर
शेताचे 7/12 प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
बँक खाते क्रमांक
सिंचन स्रोत (विहीर, शेततळे असल्याचा पुरावा)
असा करा ऑनलाईन अर्ज..
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसले त्यांनी खालील प्रमाणे अर्ज करावा. आणि तसेच महावितरण अधिकाऱ्यांशीही संपर्कात राहावं लागेल…
सर्व प्रथम ऑफिसियल वेबसाइट च्या होमपेजवर जा.
होमपेजवर गेल्यानंतर consumer portal वर क्लिक करा.
coustomer portal ला भेट दिल्यानंतर, A-1 Application Form ओपन होईल. त्यानंतर खाली स्क्रोल करा.
त्यानंतर Agriculture / कृषी वर क्लिक करा.
त्यानंतर ‘नवीन अर्जदार नोंदणी’ सेलेक्ट करा. त्यानंतर ‘कृपया मागितलेला भार प्रविष्ट करा’ आणि Submit वर क्लिक करा.
यानंतर कृपया शेतीपंप वीजपुरवठ्यासाठी खालील पैकी योजना निवडा
पारंपरिक वीज पुरवठा / सौर ऊर्जा स्रोत हा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये पारंपरिक वीज पुरवठा वर क्लिक करा
या नंतर एक नवीन फॉर्म उघडेल, त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
आणि त्यानंतर मेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे येथे सबमिट करा. आणि गेल्या मे महिन्याचे पेमेंट करून पावती डाउनलोड करा.
आणि शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाउनलोड करा.