शेतीशिवार टीम, 17 जानेवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील दोन साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. एक साखर कारखाना म्हणजे कुकडी सहकारी साखर कारखाना अन् दुसरा म्हणजे श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर. या – आधी कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून मा. आमदार राहुलदादा जगताप यांनी आपला करिष्मा दाखवुन दिला.
तर श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने प्रत्येक गटात दीड – दोन हजारांच्या मताधिक्याने 21-0 अशी आघाडी घेत पाचपुते – मगर गटाचा दारुण पराभव करत कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला.
दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप यांनी आयुष्यभर संघर्ष करुन उभारलेल्या कुकडी कारखान्याची निवडणूक त्यांच्या पश्चात बिनविरोध करण्याचा करिष्मा माजी आमदार राहुल जगताप यांनी करून दाखवला.
त्यामुळे आज त्यांची राजकीय परिपक्वता सिध्द झाली. विरोधी नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने आज कुकडी सहकारी साखर कारखान्याचे सर्व 21 जागा बिनविरोध करण्यात यश आलं.
आता कुकडी सहकारी साखर कारखाऱ्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या दि.18 (मंगळवार) 11 वाजता पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या या निवडणुकीत कुकडी कारखान्याच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा राहुल जगताप यांचीच वर्णी लागणार असल्याचं निश्चित झालं असून याबाबत उद्या त्याच्या नावाची घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
परंतु व्हाईस चेअरमन पदी मात्र कुणाला संधी मिळणार याबाबत सर्वाना उत्सुकता लागली असून याबाबत मा. आमदार राहुल जगताप यांना विचारले असता सर्व संचालक मंडळाचे मत विचारात घेऊन सर्वानुमते व्हाईस चेअरमन निवडला जाईल असे त्यांनी सांगितलं आहे.