UPSC Tricky Interview Questions : पाण्यात टाकल्यानंतर थंड होण्याऐवजी गरम होणाऱ्या पदार्थाचं नाव सांगा ?
शेतीशिवार टीम,18 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : रेल्वेला एकूण किती गीअर्स असतात ?
उत्तर : 32 गीअर्स
प्रश्न : असा कोणता चित्रपट आहे, त्यात एकूण 71 गाणी आहेत ?
उत्तर : 1932 मध्ये बनलेल्या ‘इंद्र सभा’ने या चित्रपटाने गाण्यांच्या बाबतीत विक्रम केला. या चित्रपटात 71 गाणी होती. इतकी गाणी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात दिसली नाहीत…
प्रश्न : कोणत्या लोकांना डास जास्त चावतात ?
उत्तर : एका संशोधनानुसार, ओ (O) रक्तगटाच्या लोकांना डास जास्त चावतात.
प्रश्न : पाण्यात टाकल्यानंतर थंड होण्याऐवजी गरम होणाऱ्या पदार्थाचं नाव सांगा ?
उत्तर : चुना
प्रश्न : भारतातील सर्वात उंच इमारत कुठे आहे अन् तिचं नाव ?
उत्तर : आत्तापर्यंत भारतातील सर्वात उंच इमारती ही इम्पीरियल टॉवर (Imperial Tower) आहे, ज्याची उंची 833 फूट आहे आणि त्याला 61 मजले आहेत. आता मुंबईतच वर्ल्ड वन World One ही 117 मजली इमारत बांधण्यात आली आहे, जी भारतातील सर्वात उंच इमारत मानली जाते. विकिपीडियानुसार, त्याची लांबी 8000 मीटर आहे आणि त्यात एकूण 76 मजले आहेत.
प्रश्न : भारतात कोणत्या व्यक्तीच्या वाहनाचं चलन करता येत नाही ?
उत्तर : देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान आणि भारताचे राज्यपाल यांच्या वाहनाचे चालान कोणीही कापू शकत नाही. आणखी एक गोष्ट जाणून घ्या की, राज्यपालांच्या गाडीला अपघात झाला तरी त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही…
प्रश्न : पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे, तिथे दिवस अन् रात्रीचा एकाच वेळी अनुभव येतो ?
उत्तर : पृथ्वीच्या झुकण्यामुळे, आर्क्टिक सर्कल च्या ठिकाणी हे शक्य आहे. अलास्का, उत्तरी नार्वे आणि आइसलँडमध्ये दिवस- रात्रीचा एकत्रित अनुभव येतो. त्याचे काही व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
प्रश्न : असा कोणता देश आहे, तिथे मुलीला किडनॅप करून लग्न केलं जाऊ शकतं ?
उत्तर : इंडोनेशियातील (Indonesia) सुंबा बेटावर ही वादग्रस्त परंपरा अजूनही सुरू आहे. या बेटावर जर एखाद्या तरुणाला जर एखादी तरुणी आवडत असेल तर तो तिला किडनॅप करून लग्न करू शकतो. परंतु तिच्या इच्छेविरोधात लग्न करूनही गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले जात नाही. किडनॅप करून केलेला विवाह इथे योग्य मानला जातो कारण, तो इथल्या परंपरेशी निगडीत आहे.
प्रश्न : देशातलं पाहिलं वृत्तपत्र कधी व कोणतं प्रकाशित झालं ?
उत्तर : देशातील पहिले वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी प्रकाशित झालं. हे बंगाल गॅझेटियर (Bengal Gazetteer) म्हणून ओळखले जात असे.
प्रश्न : एका वर्षात किती मिनिटे असतात ?
उत्तर : 525600 मिनिटे
प्रश्न : असं काय आहे, जे तारुण्यात हिरवं अन् म्हातारपणी लाल होतं ?
उत्तर : मिरची