शेतीशिवार टीम, 17 जानेवारी 2022 : रेशन कार्डच्‍या माध्‍यमातून सरकार लोकांना अनेक सुविधा पुरवते. तसेच त्याचे वेळोवेळी अपडेट करणं देखील आवश्यक आहे. यामुळे आपल्याला मिळणाऱ्या अनेक शासकीय सुविधांमध्ये अडथळा येणार नाही. लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांसाठी शिधापत्रिका हा एकमेव आधार होता कारण केंद्र सरकार त्याद्वारे मोफत रेशनचे वितरण करत होते.

यावरूनच रेशनकार्ड हे कागदपत्र किती महत्त्वाचं आहे यावरून तुम्हाला समजलंच असेल. यामध्ये जर काही माहिती चुकीची आढळल्यास तुम्हाला रेशन मिळण्यास अडथळा निर्माण होतो.

मोबाईल नंबर ठेवा अपडेट :-

लोकांनी त्यांच्या रेशनकार्डचा मोबाईल नंबर नेहमी अपडेट ठेवावा. जर तुम्ही तुमचा फोन नंबर अपडेट केला नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. एवढेच नाही तर तुमचे रेशन कार्डही रद्द होऊ शकतं. जर तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट नसेल तर त्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया करावी लागेल.

असा फोन नंबर करा अपडेट :-

सर्वप्रथम रेशन कार्डच्या https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx वेबसाइटवर जा.
येथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number असे लिहिलेलं दिसेल.
आता खाली दिलेल्या कॉलम (Column) मध्ये तुमची माहिती भरा.
येथे शेवटच्या रकान्यात तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहा आणि सेव्ह करा.
ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

आता रेशनकार्ड तुम्ही ऑनलाईनही काढू शकता… 

आता नवं शिधापत्रिका काढण्याची प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली आहे. आता रेशन कार्ड हे कार्ड दोन श्रेणींमध्ये बनवले आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सरकार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका बनवते, तर दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी, विना बीपीएल शिधापत्रिका सरकार बनवतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *