शेतीशिवार टीम, 17 जानेवारी 2022 : 15 जानेवारीच्या संध्याकाळी विराट कोहलीने अचानक सोशल मीडियावर पोस्ट टाकून टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर, एकीकडे त्याच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित होत असताना, तो आपल्या 100 व्या कसोटी सामन्यापासून फक्त 1 पाऊल दूर होता हे देखील अनाकलनीय होतं. आणि अशा परिस्थितीत हा निर्णय घेणं सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं.
विराट कोहलीच्या या निर्णयामागचे कारण, त्याच्या आणि BCCI मधील गेल्या काही महिन्यांतील मतभेदाव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत संघाचा 2-1 असा पराभव हे मानलं जात आहे. मात्र, आता अशीही बातमी समोर येत आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोहलीला फेअरवेल कसोटीचा कर्णधार म्हणून ऑफर दिली होती, पण त्याने ही ऑफर धुडकावून लावली आहे.
33 वर्षीय विराट कोहलीने T20 वर्ल्ड कप 2021 नंतर या छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी निवडकर्त्यांनी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकलं, ज्यावरून बराच गदारोळ झाला होता. आता त्याच्या कसोटी फॉर्मेटमधील कर्णधारपद सोडण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.
Hindustan Times ला आपल्या निवेदनात माहिती देताना, BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, कोहलीला कर्णधार म्हणून बेंगळुरूच्या मैदानावर खेळवण्यात येणारा निरोप सामना बोर्डाने ऑफर केला होता. ज्यामध्ये हे एक प्रकारे त्याचे (IPL) चं होम ग्राउंडही आहे . मात्र कोहलीने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही.
या मध्ये कोहलीने या ऑफरला उत्तर देताना म्हंटल की, मला ‘एक मॅचने काहीही फरक पडणार नाहीये…मी असा नाहीये’ मी नेहमी माझ्या संपूर्ण टीम साठी 120% देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं मला या ऑफरला होकार देण्याचा कुठलाही मनसुबा नाहीये…
भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने कसोटी मालिका पराभवाने आपली जबाबदारी संपवली आहे. त्याचवेळी हा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोहलीने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केल्याचं समोर आलं आहे.
कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याने BCCI चे आभार मानण्यासोबतच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि धोनीचेही आभार मानले. डिसेंबर 2014 मध्ये, जेव्हा धोनीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोहलीला संघाचा पुढील कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि संघ क्रमवारीत तो 7 व्या क्रमांकावर होता, ज्यामध्ये संघ आता प्रथम स्थानावर आहे.