शेतीशिवार टीम, 10 फेब्रुवारी 2022 : सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता टेन्शनमध्ये आली आहे. हा इंधनाचा वाढता खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे रस वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमी आहे.
इलेक्ट्रिक वाहने थोडी महाग असली तरी. पण त्याचा सौदा खूप फायदेशीर आहे. आज आपण अशाच एका इलेक्ट्रिक कार (Electric car) बद्दल सांगणार आहोत जी फक्त 520 रुपयांमध्ये 1000 किलोमीटरचा (Km) सहज प्रवास करू शकते.
जबरदस्त पिकअप ! कारचा वेग 9.9 सेकंदात 100 Km/h पर्यंत…
आपण Tata Nexon EV बद्दल जाणून घेणार आहोत. लांब पल्ल्याचं अंतर व्हावं म्हणून (Tata) ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे. या कारची किंमत 14,24,000 रुपयांपासून सुरू होते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 100 Km/h वेग पकडते. कार पर्मनंट AC Motor मोटरद्वारे चालविली जाते, जी 245 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. कार IP67 सर्टिफाइड 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे.
एका चार्जवर चालेल 300 Km पर्यंत…
Tata Nexon EV एका चार्जवर किमान 300 किमी धावू शकते. Nexon ची बॅटरी 15 amp प्लगने घरी देखील चार्ज केली जाऊ शकते. कंपनीने 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी दिली आहे. एका तासापेक्षा कमी कालावधीत ही कार 80% चार्ज होईल. तर स्टॅंडर्ड चार्जरवर चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तास लागतील.
याशिवाय Tata Nexon EV मध्ये सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट, EBD सह ABS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत…
फक्त 580 रुपयांमध्ये धावेल 1000 Km :-
या SUV मध्ये 30.2 kwh ची बॅटरी आहे. अशा परिस्थितीत बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी 30.2 युनिट वीज लागते म्हणजेच 6 रुपये / युनिट वीज दर विचारात घेतल्यास, एका वेळी पूर्ण चार्ज करण्यासाठी 181.2 रुपये खर्च येऊन ती 312 km चालू शकते. अशा प्रकारे, त्याची प्रति किलोमीटर किंमत 58 पैशांच्या जवळपास आहे. त्यामुळे कार 1000 किमी चालवण्यासाठी तुमची 580 रुपये वीज खर्च होईल असे कॅलक्युलेशन करता येईल.