Take a fresh look at your lifestyle.

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ; या पट्ठ्यानं 1 एकरात बांधली 2 कोटींची विहीर !

0

शेतीशिवार टीम, 10 फेब्रुवारी 2022 : बीड जिल्ह्यातुन एका शेतकऱ्याने कोणी कल्पना ही करू शकत नाही असं कार्य करून दाखवलं आहे. या शेतकऱ्याने अवकाळी अतिवृष्टी अन् सततची दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी तब्बल 1 एकरात विहीर बांधली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या विहिरीची चर्चा होताना दिसून येत आहे. सध्या ही विहीर एक पर्यटनाचं केंद्र बनलं असून सध्या जिल्ह्याबाहेरून लोक या विहिरीला भेट देत आहे. 

या विहिरीच्या मालकाचे नाव शेतकरी मारुती बजगुडे असून ते बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी गावातील आहे. या विहिरीसाठी मारुती बजगुडे यांनी दीड कोटी रुपये खर्च केला असून ही विहीर तब्बल 41 फूट खोल आणि 202 फूट रुंद असून यात दहा कोटी लिटर एवढ्या पाणीसाठ्याची कॅपॅसिटी आहे. गुगल मॅपवरही ही विहीर स्पष्टपणे दिसत आहे.

शेतकरी मारुती बजगुडे यांना 12 एकर शेती असून ते मंडप व्यावसायिक आहे. परंतु सतत दुष्काळ परिस्थितीला सामोरे गेल्याने त्यांनी शेतीवरचं लक्ष जरा कमी केलं होतं,

परंतु अचानक त्यांच्या डोक्यात आलं की बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखावी. त्यांनी याबाबत शेत टाळ्यांचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो त्यामुळे त्यानी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरविले.

अन् तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली सुरुवातीला त्यांना काही अडचणीही आल्या पण अडणींवर मत करत निघालेला मुरून त्यांनी महामार्गासाठी दिल्याने त्यांना विहिरीसाठी 15 ते 20 लाख रुपयांचा हातभार लागला.

मागील 6 महिन्यात काम जोमाने सून झालं अन् रोज 80 मजूर, माती व दगड काढण्यासाठी 10 हायवा विहिरीसाठी लावल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली.

त्यामुळे आता ही विहीर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीचं विहीर असण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी “मारुती बजगुडे यांनी नाद केला पण वाया नाही गेला” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

व्हिडीओ सौजन्य : LetsUpp Marathi 

Leave A Reply

Your email address will not be published.