Take a fresh look at your lifestyle.

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळतंय 3 लाखांपर्यंत कर्ज ; असा करा अर्ज…

0

शेतीशिवार टीम, 24 फेब्रुवारी 2022 : How to apply for Kisan Credit Card : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सध्याफारशी चांगली नाही. सध्या शेतीच्या कामासाठी शेतकरी गावातील सावकाराकडून कर्ज घेतात, त्यामुळे त्यांना कर्जासाठी वारंवार तगादा लावला जातो व त्यांना बँकांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागते.

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी, 1998 मध्ये, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना वाजवी दरात कर्ज मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू केले. ही योजना ऑगस्ट 1998 मध्ये सुरू करण्यात आली असून या किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

हे क्रेडिट आणि कृषी कल्याणावरील इनपुटसाठी स्थापन केलेल्या विशेष समितीच्या शिफारशींवर आधारित होते. KCC शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च, पीक आणि शेतीची देखभाल करण्यासाठी कर्ज पुरवते.

किसान क्रेडिट कार्डवर कोणत्या प्रकारचे कर्जे उपलब्ध आहेत ?

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बँकांकडून कर्जाची रक्कम दिली जाते. या अंतर्गत शेतकरी अनेक प्रकारची कर्जे घेऊ शकतात. याद्वारे ते शेतीचा खर्च कमी करू शकतात आणि त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकतात. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना या प्रकारची कर्जे मिळतात :-

1-पीक कर्ज
2-फॉर्म ऑपरेटिंग कर्ज
3-शेती मालकी कर्ज
4-शेती व्यवसाय
5-डेअरी प्लस योजना
6-ब्रॉयलर प्लस योजना
7-फलोत्पादन कर्ज
8-शेती साठवण सुविधा आणि गोदाम कर्ज
9-लघु सिंचन योजना
10-जमीन खरेदी योजना इ.

KCC साठी पात्रता :-

जो कोणी कृषी संलग्न कार्यात गुंतलेला आहे तो किसान क्रेडिट कार्डसाठी (KCC) अर्ज करू शकतो. किसान क्रेडिट कार्डसाठी किमान वय 18 वर्षे ठेवण्यात आलं आहे, तर कमाल वय 75 वर्षे असावे. जर कर्जदार हा ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांवरील) असेल तर सह-कर्जदार हा कायदेशीर वारस असला पाहिजे.

KCC साठी कागदपत्रे :-

तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला क्रेडिट कार्डची (Kisan Credit Card) सुविधा घ्यायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील.

मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
आधार कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्स
जमिनीची कागदपत्रे

शेतकऱ्यांना मिळेल 3 लाखांपर्यंत कर्ज…

किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card) माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्ड हे पाच वर्षांसाठी वैध आहे. किसान क्रेडिट कार्डवर सरकार 2% सूट देते आणि जर तुम्ही वेळेवर पैसे भरले तर तुम्हाला 3% अतिरिक्त सूट दिली जाते. हे सर्व एकत्र करून किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card) माध्यमातून शेतकऱ्यांना अवघ्या 4% व्याजदराने कर्ज सहज मिळते.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा कराल ?

तुम्ही शेतकरी असाल आणि KCC घ्यायचे असेल, तर त्यासाठी अर्ज करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
सर्वप्रथम, तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज मिळवायचं आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल
येथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड (KCC) ऑप्शन दिसेल.
यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तसेच ऑफलाईन प्रिंट ही काढू शकता..
अर्ज डाउनलोड करून आणि प्रिंट काढा…
अर्ज काळजीपूर्वक भरा.
जवळच्या बँकेच्या शाखेत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
कर्ज अधिकारी अर्जदारास आवश्यक माहिती सामायिक करेल
अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी तीन ते चार कामकाजाचे दिवस लागतील.
कर्जाची रक्कम मंजूर होताच पोस्टाने कार्ड पाठवले जाईल. किंवा बँकेतून फोन येईल.

बँकेच्या शाखेला भेट देणे :-

किसान क्रेडिट कार्डची मागणी करणारे शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्याला भेटू शकतात आणि बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात. अर्जदाराला अर्ज भरण्यासाठी अधिकारी मदत करेल. नंतर, कर्ज अधिकारी आवश्यक डिटेल्स तुम्हाला सांगेल अन् अर्जावर ल;लवकरात लवकर प्रोसेस होईल…

किसान क्रेडिट कार्ड कोणत्या बँका देतात?

अशा अनेक बँका आहेत, ज्याद्वारे तुम्ही किसान क्रेडिट कार्ड कर्ज घेऊ शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया
अँक्सिस बँक
एचडीएफसी बैंक
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)

Leave A Reply

Your email address will not be published.