Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक मोटर, PVC, HDPE पाइपसाठी 30 हजारांपर्यंत अनुदान, पाइपसाठी 500 मीटरपर्यंत मर्यादा, पहा ऑनलाईन अर्ज स्टेप – बाय स्टेप प्रोसेस..

0

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना कधीकधी शेतीमध्ये सिंचनासाठी पाइपलाइन आणि इलेक्ट्रिक मोटर्स खरेदी करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत सरकारकडून या सिंचन साधनांवर अनुदान देण्यासाठी ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत अन्नधान्य, तेलबिया ऊस व कापूस’ यामध्ये सिंचन साधने यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना या यंत्रांसाठी 50 ते 75% पर्यंत अनुदान देण्यात येते..

किती मिळणार अनुदान..

यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी प्रति मीटर 35 रुपयाने 500 मीटरपर्यंत । तर HDPE पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटरपर्यंत अनुदान देण्यात येते म्हणजे तब्बल 17,500 हजारांपर्यंत अनुदान तर 10 HP पर्यंत किमान 4 स्टार रेट असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसाठी 10 हजार रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांना सिंचन करणे सोपे होणार आहे. चला, तर मग शेतीशिवारच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊया की हे अनुदान कसे मिळवायचे ? यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

आवश्यक कागदपत्रे :-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 1 एकर तरी शेतजमीन असावी.
7/12 व 8A उतारा
बँक खाते पासबुक
पासपोर्ट साइज फोटो
ओळख पुरावा (आधार कार्ड)
अर्ज भरताना सर्व्हे नंबर / गट नंबर माहिती असायला हवा.

इलेक्ट्रिक मोटरसाठी अर्ज कसा कराल ?

1) या योजनेसाठी तुम्हाला राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जावं लागेल.

2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा..

3) नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ‘अर्ज करा’ यावर क्लिक करा.

4) यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी दिसतील, यामध्ये 2 री बाब म्हणजे ‘सिंचन साधने आणि सुविधा‘ या ऑप्शनवर क्लिक करा.

5) यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स भरा जसे की, गाव, तालुका, सर्व्हे नंबर, मुख्य घटकमध्ये ‘ सिंचन साधने आणि सुविधा’ तर बाबीमध्ये पंपसेट / इंजिन / मोटर, तर उपघटकामध्ये इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 HP पर्यंत (किमान 4 स्टार रेट असलेल्या ISI / BEE सह) इतपर्यंत माहिती भरावी.

6) त्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा. तुमची बाब SUCCESS होईल..ती पुन्हा अर्ज सादर करा वर रिडायरेक्ट वेर जाईल, अन् तुमची बाब ऍड झाली का ते पहा. यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मॅसेज येईल त्यानंतर तुम्हाला WINNER असा मॅसेज येईल.

पीव्हीसी पाईपसाठी कसा अर्ज कराल ?

पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करण्यासाठी वरीलप्रमाणे फक्त 5) व्या स्टेप मध्ये बदल करा तो खाली इमेजमध्ये देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.