तसे पाहता, पोलीस सेवेमध्ये अनेक पदांची भरती यूपीएससी किंवा पीसीएस परीक्षेमार्फत केली जाते. महाराष्ट्र राज्यात एमपीएससीच्या मार्फतही अनेक पदे भरली जातात. यात डीएसपी हे एक महत्त्वाचे पद असते. डीएसपी अर्थात डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस उपअधीक्षक हे पद.. 

या पदावरच्या व्यक्तींना अनेक सेवा व लाभ मिळतात. त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यांना उत्तम वेतनही मिळते. पोलीस उपअधीक्षक बनण्यासाठी काय पात्रता लागते, त्यांना किती वेतन मिळते. त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, याबद्दल आणि या पदाच्या अनुषंगाने इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया..

भारतात अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक करतात. छोट्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक हे काम पाहतात. त्याव्यतिरिक्त पोलीस उपअधीक्षक हे एक महत्त्वाचे पद पोलीस सेवेत असते. हे राज्य स्तरावरचे पोलीस अधिकारी असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

किती मिळतं वेतन ?

प्रशासकीय सेवा परीक्षांद्वारे पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली जाते. प्रत्येक राज्यात या पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. या पदासाठी 53,100 ते 1,67,800 रुपयांचे वेतनमान आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी वेतन दिले जाते. सर्वसाधारणपणे पोलीस उपअधीक्षक पदासाठी 73.915 रुपये वेतन हातात मिळू शकते.

पोलीस उपअधीक्षक हे पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली काम पाहतात. पोलीस विभागातल्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवण्याचे एक काम त्यांच्याकडे असते. गुन्हे रोखणे, पोलीस स्टेशनमधले प्रशासन आणि व्यवस्थापन, तपासावर लक्ष ठेवणे या सगळ्या जबाबदाऱ्या पोलीस उपअधीक्षकांना पार पाडाव्या लागतात.

काय असतात जबाबदाऱ्या..

जिल्ह्याचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना डीएसपी त्यांच्या खालच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती गोळा करतात आणि वरिष्ठांना त्याचे अहवाल पाठवतात. राजकीय रॅली, कार्यक्रमांमध्ये जमावावर नियंत्रण ठेवण्याचे कामही त्यांच्याकडे असते. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक नव्या पद्धती विकसित करतात. सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवतात. समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊ नये, नागरिकांमध्ये चांगले संबंध राहावेत, यासाठी ते प्रयत्नशील असतात. नागरिक कायद्याचे पालन करत आहेत का हेही पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

पात्रता :-

डीएसपी बनण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा लागतो, म्हणजेच त्याचा जन्म भारतात झालेला असावा. वयोमर्यादा 21 – 30 वर्षे (प्रत्येक राज्यानुसार वयोमर्यादा बदलते) इतकी असते. एससी व एसटी गटासाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत आहे.

उमेदवाराने कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. डीएसपी होण्यासाठी, कोणत्याही उमेदवारांना यूपीएससी किंवा पीसीएस (प्रांतीय नागरी सेवा) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर त्यांच्या रँकच्या आधारे त्यांची डीएसपी पदासाठी निवड केली जाते; पण डीएसपी होण्याचे आणखी काही मार्ग असू शकतात. खेळात प्रवीण असलेल्यांची डीएसपी पदावर निवड होऊ शकते. काही वेळा आयपीएस अधिकाऱ्याचीही पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.

डीएसपी या पदासाठी वेतनासह उमेदवारांना महिंद्रा बोलेरो टोयोटा इनोव्हासारखी अधिकृत गाडी, शासकीय निवासस्थानात 24 तास काम करणारे सुरक्षारक्षक असतात. एक वैयक्तिक आचारी आणि घरकाम करणारा सुरक्षेसाठी तीन पीएसओ (वैयक्तिक सुरक्षारक्षक) पोलीस उपअधीक्षकांना दिले जातात.

डीएसपी पदासाठी चढता क्रम..

पोलिस उपअधीक्षक (डीएसपी)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP)

पोलीस अधीक्षक (SP)

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP)

पोलीस महानिरीक्षक (DIGP)

पोलीस महानिरीक्षक (IGP)

अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP)

पोलिस महासंचालक (DGP) इ..

DSP होण्याची तयारी कशी करावी ?

तुम्हाला भविष्यात डीएसपी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा.

डीएसपीच्या तयारीसाठी तुम्ही मागील वर्षाचे प्रश्न सोडवावेत आणि नीट वाचून समजून घ्यावेत म्हणजे तुम्हाला परीक्षेत सोपे जाईल.

तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान सुधारावे लागेल कारण या परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न अधिक आहेत.

डीएसपी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे लागेल, त्यासाठी तुम्ही दररोज अधिकाधिक योगासने करावीत जेणेकरून तुमचे शरीर तंदुरुस्त राहील.

पोलीस खात्यात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या अशा लोकांशी तुमचा संबंध मजबूत करा कारण त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळते.

तुमचे लक्ष्य सेट करा आणि त्यानंतर तुमची DSP तयारी सुरू करा.

डीएसपी परीक्षा देताना नापास झालात तर पुन्हा प्रयत्न करा कारण पराभवाने कधीही निराश होऊ नका.
तुमच्या परीक्षेची तयारी पूर्ण प्रामाणिकपणे, मेहनतीने आणि समर्पणाने करा.

शारीरिक चाचणीसाठी 6 महिने आधीच तयारी सुरू करा.

इंटरनेटवर डीएसपीबद्दल माहिती शोधा.

ज्या विषयांमध्ये तुम्ही कमकुवत आहात त्या विषयांवर आणि अभ्यासक्रमावर अधिक लक्ष केंद्रित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *