शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : राज्याची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रूग्ण आढळल्यानंतर आता या व्हेरियंटची पुण्यात एन्ट्री झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात एका रुग्णाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
नॅशनल केमिकल लॅबोरटरीचा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आलेल्यांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे तर . तर फिनलंड येथून पुण्यात आलेला एक व्यक्ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह वाढला आहे.
पिंपरीत सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांच्या निकटसहवासातील आहेत. नाजेरियातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी करण्यात आली होती.
Pune: Four persons who returned from foreign tours and three of their close contacts test positive for Omicron variant: Maharashtra health official
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2021
यामध्ये महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याची दीड आणि 7 वर्षाच्या दोन मुली कोविड बाधित आल्या होत्या. या तिघांचा ओमायक्रॉन विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासह आता ओमिक्रॉन व्हेरियंटची संख्या आता देशभरात डझनभर झाली आहे.