शेतीशिवार टीम : 21 सप्टेंबर 2022 :- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे आपल्यात राहिले नाहीयेत…खपच जड अंतःकरणाने हे सांगावं लागत आहे की, राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. राजू श्रीवास्तव यांचे वय 58 वर्षे होतं. गेल्या अनेक दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रत्येकाला त्यांच्या बरे होण्याची आशा होती. शेवटी आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

सेलेब्स-चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली…

राजू श्रीवास्तव यांच्या अचानक निरोपाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूड आणि टीव्ही कॉरिडॉरमध्ये शोककळा पसरली आहे. या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या ओल्या डोळ्यांनी कॉमेडियनला आदरांजली वाहत आहे.

नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा, मग तो टीव्ही स्क्रीनवर असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजूचा निरोप घेणे धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजूची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही…

आपल्यामागे पत्नी आणि दोन मुलांना सोडून गेले…

राजू श्रीवास्तव त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेत असत. राजूने कधीही जिम आणि वर्कआउट चुकवले नाही. सोशल मीडियावर ते खूप सक्रिय असायचे आणि नेहमीचं चाहत्यांना हसवण्याचा त्यांचा उद्देश असायचा. त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर तुम्हाला अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतील. राजू श्रीवास्तव आता या कॉमिक व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या आठवणीत राहणार आहेत. राजू आपल्या मागे पत्नी आणि दोन मुले सोडून गेले..

कॉमेडी शोमधून मिळाली ओळख

राजू श्रीवास्तव हे शोबिज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होतं. त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले. राजू रियॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमधून राजूला ओळख मिळाली. या शोच्या यशानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव एक अभिनेता, विनोदी अभिनेता तसेच एक नेता होते. ते भाजप या राष्ट्रीय पक्षाशी संबंधित होते. कोणत्याही गॉडफादरशिवाय राजूने इतके यश मिळवलं होतं ते प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *