पेट्रोल, डिझेल, रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करणे हा सध्या तोट्याचा सौदा ठरत आहे. त्यामुळे जागरूक शेतकरी पारंपरिक ऊस, बटाटा, गहू, भातशेती सोडून चंदन शेतीकडे वळताना दिसत आहे. यूपीच्या बिजनौरमध्ये, देखील बरेच शेतकरी चंदनाच्या लागवडीकडे वळले आहेत, तर काही शेतकरी ड्रॅगनफ्रूट, किवी आणि एवोकॅडो सारख्या फळांची लागवड करत आहेत. यासोबतच अनेक शेतकरी अश्वगंधा, कोरफड, शतावर, तुळशी या औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत.

बिजनौरच्या बलीपूर गावचे चंद्रपाल सिंह हे देखील एक असेच शेतकरी आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या शेतात पांढऱ्या आणि लाल चंदनाची लागवड करत आहेत. चंद्रपाल सिंग सांगतात की सुरवातीला 150 रुपयांना मिळणारे चंदनाचे रोप 10 ते 12 वर्षांनी सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत विकले जाते.

आपण फक्त व्यवस्थितपणे रोपांची काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच संयम ठेवणे देखील आवश्यक आहे. चंदनाला जगभरातुन मोठी मागणी आहे. चंदन, तेल आणि भुसा यांच्या वापराच्या तुलनेत पुरवठा मात्र खूप कमी आहे. त्यामुळे चंदन खूप महाग विकले जाते.

3 वर्षांनंतर किंमत असेल 3 कोटी रुपये.. 

दुसरीकडे, चंदपूरचे रहिवासी शिवचरण सिंह यांनी आपल्या जमिनीत लाल चंदनाची रोपे लावली होती, ज्याची आता 20 फूट उंचीची झाडे झाली आहेत. शिवचरण सिंह सांगतात की त्यांच्या शेतात लाल चंदनाची 1500 झाडे आहेत, ज्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. पण तरीही त्यांना ही किंमत आणखी वाढवायची आहे. यासाठी आणखी 10 वर्षांनी झाडे विकण्याचा त्यांचा मानस आहे. शिवचरण सिंह यांना अपेक्षा आहे की त्यांच्या झाडांची किंमत 3 वर्षांनी 3 कोटी रुपये होईल.

200 हून अधिक शेतकऱ्यांनी केली आहे चंदनाची लागवड..

बिजनौरचे डीएम उमेश मिश्रा यांनी सांगितले की, बिजनौरमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चंदनाची लागवड सुरू केली आहे. यासोबतच काही शेतकरी ड्रॅगन फ्रूट ची लागवड करत आहेत. बिजनौरच्या बलिया नागली गावातील जयपाल सिंह यांनी 1 एकर जागेत पर्पल ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे, ज्यातून ते दरवर्षी 5 लाख रुपये कमवत आहेत. थायलंड आणि चीनचे हे फळ 100 ते 150 रुपयांना मिळते.

बिजनौरचे हवामान आहे अनुकूल..

सध्या बिजनौरमधील 100 हून अधिक शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. हे फळ निश्‍चितच महाग असले तरी ते शेतातूनच रोखीने विकले जाते. त्याचबरोबर काही शेतकरी किवी आणि अँव्होकॅडोच्या फळबागाही करत आहेत. साधारणपणे ही सर्व फळे थंड भागात उत्पादित केले जातात. उत्तराखंडच्या डोंगराला लागून असल्याने बिजनौरचे वातावरण त्यांया सर्व फळबागांना खूप अनुकूल आहे.

ही शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान..

विशेष म्हणजे, आतापर्यंत बिजनौरमधील शेतकरी मुबलक प्रमाणात उसाची लागवड करत होते. याशिवाय भात, गहू, बटाटा या पिकांची पारंपारिक शेती हेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. पण आता चंदन, ड्रॅगन फ्रूट, एवोकॅडो, किवी आणि ड्रमस्टिकची लागवड केल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा आहे.

बिजनौरचे अनेक शेतकरी कोरफड, अश्वगंधा, शतावरी आणि तुळशी यांसारख्या औषधी वनस्पतींचीही लागवड करत आहेत, ज्यांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. या औषधी वनस्पती बाजारात चांगल्या किमतीत विकल्या जातात. त्यामुळे हा नवीन प्रकारचा शेती व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

शेतकरी बांधवानो, लाल चंदनाची शेती करण्यास इच्छुक असाल तर :- या लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *