कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची आर्थिक मदत ; जाणून घ्या, आवश्यक कागदपत्रे अन् अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस…
शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात राज्य सरकारने जीआर काढला असून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम पात्र लोकांच्या बँकेत थेट जमा होणार असून ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.
मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी / अर्जदारांनी mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक असून खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे .
#कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या https://t.co/8VIEZ6iyRv या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा.#COVID19 pic.twitter.com/8MLJMe0d4p
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 1, 2021
कागदपत्रे
1) अर्जदार आधार कार्ड
2) मृत्यू झालेल्या व्यक्तीची आधार कार्ड प्रत
3) मृत्यू दाखला
4) अर्जदार आधार कार्ड लिंक बॅंक खाते क्र.
5) अर्जदाराच्या बँक खात्याचा रद्द केलेला चेक
6) मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय रिपोर्ट
7) आर.टी.पी.सी.आर (RTPCR) रिपोर्ट किंवा सी.टी स्कॅन रिपोर्ट.( 6 वा क्र. नसेल तर)
त्यानुसार मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.