शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : सध्या सगळीकडं थंडीचा तडाखा कमालीचा वाढल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचं चित्र आहे. गारव्याचा सुखद मिळत असला तरी करोनाकाळात मात्र टू – व्हीलर वाल्यांच्या अडचणित नक्कीच वाढ झाली आहे. काहींना कामानिमित्त सकाळ – सकाळ बाहेर पडावं लागत असल्याने थंडी जास्तच जाणवत आहे.
तसं थंडी टाळण्यासाठी आपण जाड कपडे आणि स्वेटर घालतो, पण तरीही टू – व्हीलर थंड हवा आपल्या शरीरात पोहोचते. डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी हेल्मेटची काच बंद केली जाते पण समोरून अंगावर खूप थंड हवा येते.
ही थंडी टाळण्यासाठी तुम्हला अतिशय स्वस्त जुगाड सांगणार आहोत. जे कमी खर्चात बाईक चालवताना तुम्हाला थंड वाऱ्यापासून वाचवेल. हा उपाय तुमच्या सायकल प्रवासातही आराम देईल.
थंड हवा रोखण्यासाठी तुम्ही न्यूज पेपर वापरू शकता. जे तुम्हाला सर्वत्र सहज उपलब्ध होईल. तो वापरण्यासाठी, तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांमध्ये ठेवा. यामुळे हवा बाहेर जाऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला थंडी कमी जाणवेल. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. अवघ्या दोन ते पाच रुपयांत तुम्ही या हिवाळ्यात सकाळ – सकाळ घराबाहेर पडू शकता..
सर्वसाधारणपणे परिधान केलेल्या उबदार कपड्यांमध्ये बाइक चालवताना हवा जाते. त्यामुळे थंडी जास्त जाणवते. अशा परिस्थितीत तुम्ही न्यूजपेपरच्या मदतीने ते थांबवू शकता आणि बाइक चालवताना तुम्हाला थंडीचा त्रास होणार नाही.
याशिवाय हातात हातमोजे घालावेत. जेणेकरून तुमचे हात थंड होऊ नयेत. बाईकवर घराबाहेर जाताना हेल्मेटचा शिसा जरूर साफ करा…