गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क या कोस्टल रोड अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी बोगदा (India First-Ever Undersea Twin Tunnels)आहे, जो लवकरच मुंबईकरांना भेट म्हणून दिला जाणार आहे.

बीएमसी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावर देखरेख करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2.07 किमी लांबीच्या दुसऱ्या बोगद्याचा 1 किमी समुद्राखाली बांधला आहे. हा मलबार हिल बाजूच्या विव्हिंग डेकपासून मफतलाल क्लबपर्यंत समुद्राखाली बांधला गेला आहे. दुसरीकडे, मलबार हिल ((Longest Undesea Tunnel in India) च्या टेकडीखाली खडक कापून एक किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

समुद्राखालून बोगदे बनवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी, टेकडीखालून बोगदे बनवणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. असे असतानाही TBM मशिनच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोगदा फोडण्याची योजना असल्याचे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी पत्र पाठविण्यात आले असून, ज्या दिवशी मंजुरी मिळेल त्याच दिवशी ब्रेकथ्रूचे काम केले जाईल. त्याची तयारी सुरू आहे.

11 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बोगद्याचा श्रीगणेशा करण्यात आला होता. पहिल्या बोगद्याचे काम 10 जानेवारी 2022 रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिल 2022 पासून सुरू झाले. मलबार हिल टेकडी, हँगिंग गार्डन आणि गिरगावातील समुद्राखालून हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

10 ते 70 मीटर खाली बांधण्यात आहे बोगदे..

जुळे बोगदे जमिनीच्या खाली 10 मीटर ते 70 मीटर खोलीवर बांधलेले आहेत. दुसऱ्या बोगद्याचे काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र TBM मशीनचा एक भाग तुटल्याने कोस्टल रोडसाठी बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले होते, मात्र सुमारे तीन महिन्यांच्या विलंबानंतर हे काम मे अखेरपर्यंत पूर्ण झाले आहे.

6 लेन रस्ता..

भूमिगत बोगद्यामध्ये एकूण 6 लेनचा रस्ता तयार करण्यात येत आहे. बोगद्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास, बीएमसी, मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आपत्कालीन संदेश जाईल. त्यामुळे तातडीने मदत देणे शक्य होणार आहे. कोस्टल रोडचे 75 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. BMC प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक पर्यंत 10.58 किमी लांबीचा रस्ता बांधत आहे. यासाठी 12700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी बीएमसी कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा मानत आहे. त्याच्या निर्मितीमुळे 34 टक्के इंधन आणि 70 टक्के वेळेची बचत होईल, असा विश्वास बीएमसीला आहे. वरळीजवळील पुलाचे काम वगळता इतर कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याची बीएमसीची अपेक्षा आहे.

45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटात होणार पार..

या बोगद्याची निर्मिती झाल्यानंतर गिरगाव ते वरळी हे अंतर कमी होणार असून 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या बोगद्याचा व्यास 12.19 मीटर आहे. तर त्याची खोली ही समुद्रसपाटीपासून 17-70 मीटर आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोगद्याचा सुमारे 2 किलोमीटरचा भाग समुद्राखाली बांधण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *