7th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरमध्ये होणार मोठा बदल ! ग्रेड पे – मध्ये होणार थेट ₹49,420 रुपयांची वाढ…
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षी त्याच्या पगारात अनेक मोठे बदल दिसून येणार आहे. नवीन वर्षात महागाई भत्त्यात पुन्हा मोठी वाढ तर होईलच, तर सरकार पुढील वेतन आयोगासह फिटमेंट फॅक्टरवरही अपडेट येणार आहे.
आधी महागाई भत्त्याबद्दल जाणून घेऊया, AICPI निर्देशांकाचा आत्तापर्यंत आलेला आकडा असे सूचित करतो की, पुढच्या वेळी 4 – 5 टक्के वाढ दिसून येईल. त्यामुळे उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपयांहून अधिक वाढ मिळणार आहे. 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे..
महागाई भत्ता 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार..
46 टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) मिळाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार नवीन वर्ष जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4-5 टक्क्यांनी वाढ करू शकते. AICPI निर्देशांकाची सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत महागाई भत्त्यात 2.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या DA स्कोअर 48.54 टक्के आहे. अंदाज बरोबर असल्यास, महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो..
बेसिक सॅलरी 8000 रुपयांनी वाढणार..
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहे, त्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरही वाढवणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. 7व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 8,860 रुपयांची वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 आहे. जर ते 3.68 पर्यंत वाढवले तर लेव्हल -1 ग्रेड पेची किमान मर्यादा 26,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. म्हणजेच पगारात थेट 8000 रुपयांची वाढ होणार आहे..
पगारात 49,420 रुपयांची होणार वाढ..
उदाहरणार्थ – जर लेव्हल – 1 वर ग्रेड पे 1800 वर केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळून, फिटमेंट फॅक्टरनुसार, कॅल्क्युलेशन केलेला पगार 18,000 रुपये X 2.57 = रुपये 46,260 असेल, जर हे 3.68 मानले तर पगार 26,000X3.68 = 95,680 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारातील एकूण फरक 49,420 रुपये असेल. हे कॅल्क्युलेशन किमान बेसिक सॅलरीवर करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त पगार असलेल्यांना मोठे फायदे मिळतील..
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय ?
फिटमेंट फॅक्टर हे सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्याचे सूत्र आहे. 7व्या वेतन आयोगाच्या (7व्या CPC) शिफारशींवर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढतो. शेवटच्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 6 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये करण्यात आले.
7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचार्यांचे वेतन निश्चित करताना, भत्ते (महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) इत्यादी) वगळून, कर्मचार्यांच्या मूलभूत घटकाची गणना फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार करून केली जाते..