शेतीशिवार टीम, 24 जानेवारी 2022 : पुण्यातील शिरूर तालुक्यातील पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर येथील 24 वा मैल येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने डिव्हायडर तोडून ट्रक विरुद्ध दिशेला गेल्यामुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.या जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात असताना अनियंत्रित झालेल्या ट्रकने विरुद्ध दिशेला येऊन कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली. ट्रक हा तळेगाव ढमढेरे गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर फरार झाला असून पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहेत

फोर व्हीलर वाहन आणि दोन्ही टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले असताना ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला. या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.

अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे (रा. वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत होते.

अपघातामुळे मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले असून

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी आणि उपनिरीक्षक अमोल खटावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून संबंधितावर गुन्हा दखल करण्याचं काम केलं आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *