शेतीशिवार टीम, 24 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : अंड्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
उत्तर: अंड्याचे बाह्य कवच कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेलं असतं, त्याचे रासायनिक सूत्र CaCO3 आहे.

प्रश्न : टॉम आणि जेरी कार्टून कोणी तयार केलं ?
उत्तर : टॉम अँड जेरी (Tom and Jerry) ही विल्यम हॅना (William Hanna) आणि जोसेफ बारबेरा (Joseph Barbera) यांनी तयार केलेली 1940 च्या कॉमेडी चित्रपटांची अमेरिकन अँनिमेटेड सिरीज आहे.

प्रश्न : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1930 मध्ये बॉलीवूडची स्थापना झाली, 1934 मध्ये हिमांशू राय यांनी सुरू केलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये (Bombay Talkies) भारतीय सिनेमाच्या विकासाला वेग आला.

प्रश्न : सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो अन् कुठे मावळतो ?
उत्तर : नॉर्वेला (Norway) मावळत्या सूर्याचा देश म्हणतात कारण, तिथे सूर्य सर्वात आधी नॉर्वेत मावळतो. तर सर्वात आधी सूर्य उगवतो तो देश म्हणजे जपान होय.

प्रश्न : IQ चा फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे ?
उत्तर : IQ चे फुल फॉर्म म्हणजे Intelligence Quotient.(IQ) ही बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रमाणित टेस्टिंगमधून काढलेली गणना आहे. ‘IQ’ हा शब्द जर्मन शब्द Intelligenz-Quotient पासून आला आहे, 1912 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस आधुनिक मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पद्धतींसाठी प्रथम वापरला. परंतु आजही “IQ” हा शब्द अजूनही जगभरात सगळीकडे वापरला जातो.

प्रश्न: एक लीटरमध्ये हेलिकॉप्टर नेमकं किती मायलेज देतं ?
उत्तर: हेलिकॉप्टर एका तासात 50 लिटर ते 60 लिटर इंधन वापरते. आणि एक मैल उडण्यासाठी 1 गॅलन इंधन लागतं. त्याची सरासरी काढण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 180 किलोमीटर मानला, तर हेलिकॉप्टर 1 लिटर इंधनात 3 ते ४ किलोमीटर उडू शकतं.

प्रश्न : भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी आढळला ?
उत्तर : 30 जानेवारी 2020

प्रश्न : जगातील सर्वात पहिली सेल्फी कोणी घेतली होती ?
प्रश्न : जगातील सर्वात पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कार्नेलियस या व्यक्तीने घेतली होती.

प्रश्न : आपली नखे कशापासून बनलेली असतात ?
उत्तर : नखे केराटिन (Keratin) नावाच्या पदार्थाने बनलेले असतात, जो कठोर आणि मृत प्रोटिन्सने बनलेला सिंग सारखा पदार्थ असतो.

प्रश्न : भारतीय नोटेवर गांधीजींचे फोटो कधी छापण्यात आला ?
उत्तर : 1969 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींचा फोटो असलेली 100 रुपयांची पहिली नोट जारी केली. यामध्ये गांधीजींना सेवाग्राम आश्रमासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे.
… तर ऑक्टोबर 1987 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नोट जारी केली ज्यामध्ये महात्मा गांधींचे हसरे चित्र होते. त्यावर सिंहाची राजधानी आणि अशोक स्तंभावर वॉटर मार्क होते.

प्रश्न : क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला षटकार कोणी मारला होता ?
उत्तर : क्रिकेटमधील पहिला षटकार ऑस्ट्रेलियन खेळाडू चार्ल्स बॅनरमन (Charles Bannerman) याने 3 जून 1877 रोजी मारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *