शेतीशिवार टीम, 23 जानेवारी 2022 : बरेच लोक असे आहेत ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात (Business) जास्त रस आहे. कोरोनाच्या काळात व्यवसायाचे महत्त्व दुप्पट झाले आहे.अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर प्रथम त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
आम्ही तुम्हाला अशाच एका खास व्यवसायाची संपूर्ण माहिती देत आहोत, जो सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय म्हणजे बटाटा चिप्स बनवण्याचा (Potato Chips Manufacturing Business) बिजनेस आहे.
याच्या चिप्सचा वापर स्नॅक म्हणूनही केला जातोय. तुम्ही फक्त 850 रुपयांची मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकता. नंतर तुम्ही त्यात अधिक गुंतवणूक करून ते मोठ्या प्रमाणात करू शकता. जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर तुमचे उत्पन्न आणखी वाढू शकते.
अत्यंत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करा :-
जर एखादा व्यवसाय सुरू केला जातो तेव्हा त्याच्या मशीनची किंमत 10,000-15,000 असेल असा अंदाज आहे. पण आम्ही ज्या मशीनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत फक्त 850 रुपये आहे.याशिवाय कच्च्या माल(रॉ मैटेरियल) साठीही काही खर्च करावा लागणार आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात कच्चा माल(रॉ मैटेरियल) 100 ते 200 रुपयांना मिळेल.
हे मशीन तुम्हाला ऑनलाइन सहज मिळेल. कोणत्याही टेबलावर ठेवून तुम्ही चिप्स सहजपणे कापू शकता.ते जास्त जागा घेत नाही आणि चालण्यासाठी इलेक्ट्रिक ची गरज लागत नाही.आपण ते सहजपणे हाताने ऑपरेट करू शकता. ती कोणतीही महिला किंवा बालक सुद्धा चालवू शकते.
विक्री कशी करता येईल :-
आजकाल तळलेले चिप्स खाण्याचा ट्रेंड खूपच वाढत चालला आहे.काही लोकं समोरा-समोर तळून चिप्स खातात. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ट किंवा दुकान उघडून लगेच चिप्स (Chips) तळून विकू शकता. दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही त्यांना छोट्या-छोट्या पॅकेटमध्ये भरून लोकांना देऊ शकता. थोडंसं Skill जोडल्यानंतर चिप्स इत्यादी विकणाऱ्या दुकानदारांशी संपर्क साधा. त्यामुळे हळूहळू तुमचे नेटवर्क वाढेल आणि तुम्ही हा छोटा व्यवसाय मोट्या प्रमाणात वाढवू शकता.
तुम्ही अंदाजे किती कमवाल :-
बटाटा चिप्स (Potato Chips) बनवण्यासाठी कच्च्या माला (रॉ मैटेरियल) वर जेवढे पैसे खर्च होतात त्याच्या 7-8 पट पैसे कमवता येतात. एका दिवसात 10 किलो बटाट्याच्या चिप्स बनवल्या तर एका दिवसात 1000 रुपये सहज कमावता येतील. यासाठी विशेष गुंतवणूक करावी लागणार नाही.