शेतीशिवार टीम, 23 जानेवारी 2022 : भारतीय शेअर मार्केट (Stock Market) साठी 2021 हे वर्षसाठी चांगले होते. गेल्या वर्षी मल्टीबॅगर स्टॉक लिस्ट(Multibagger stock list) मध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक्सनी प्रवेश केला होता.आता गुंतवणूकदार 2022 मध्ये चांगला रिटर्न्स देणारे स्टॉक शोधत आहेत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल, तर आम्ही तुम्हाला अशा आशादायक स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये 153 टक्क्यांहून अधिक (Stock return) रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. चला सविस्तर जाणून घेऊया-
15 दिवसांत 153.43% रिटर्न्स दिला :-
आपण जाणून घेत आहोत टेक्सटाईल स्टॉक – (एके स्पिंटेक्स) AK Spintex बद्दल बोलत आहोत. 3 जानेवारी 2022 रोजी या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 33.50 रुपये होती. 21 जानेवारी 2022 रोजी त्याची शेवटची किंमत 84.90 रुपये होती. म्हणजेच, जानेवारी महिन्याच्या 15 व्या ट्रेडिंग सत्रात, या शेयर्सने आपल्या गुंतवणुक करणाऱ्यांना 153.43% इतका मल्टीबॅगर रिटर्न्स दिला आहे.
गेल्या 1 महिन्यात, AK Spintex स्टॉकची किंमत 24.35 रुपये (23 डिसेंबर 2021 स्टॉप किंमत) वरून 84.90 रुपये (21 जानेवारी 2022 स्टॉप किंमत) पर्यंत वाढली आहे. या काळात या शेयर्सने आपल्या गुंतवणुक करणाऱ्यांना 248.67% रिटर्न्स दिला आहे.
गुंतवणूकदारांना झाला मोठा नफा :-
जर गुंतवणुकदाराने महिन्याभरापूर्वी या टेक्सटाइल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 3.48 लाख रुपये झाली असती.त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी 3 जानेवारी रोजी 33.50 रुपयांच्या पातळीवर या टेक्सटाईल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 2.53 लाख रुपये झाली असती. गेल्या एका आठवड्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सर्व ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला गेला आहे. या वर्षासाठी कल्पनीय मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक मानला जातो.
काय आहे कंपनीचा व्यवसाय :
ही कंपनी मूळत: ‘AK Processors Pvt Ltd’ या नावाने आणि स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून सुरू झाली होती.त्याची सुरुवात 6 ऑक्टोबर 1994 रोजी झाली. मानवनिर्मित कापडांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.
नंतर 6 जानेवारी 1995 रोजी कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी रूपांतरित करण्यात आले.ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या. वस्त्रोद्योग विकासावर सरकारने भर दिला.या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने कपड़ा प्रोसेसिंग बिजनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.