शेतीशिवार टीम, 23 जानेवारी 2022 : गेल्या दोन वर्षांत, जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला असतानाही भारतात मोठ्या प्रमाणात स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger stock) यादीत दाखल झाले आहेत.
अशा परिस्थितीत शेअर बाजारातून कमाई करण्यासाठी गुंतवणूकदारांची उत्सुकताही वाढली आहे. जर तुम्ही देखील शेअर बाजारातून कमाई करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे असे समजा…
आज आपण अशाच टाटाच्या (Tata) टॉप- 5 छुप्या रुस्तम स्टाक्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने एका वर्षात चांगले रिटर्न्स देऊन गुंतवणुकदारांना श्रीमंत केलं आहे. या कंपन्यांबद्दल जास्त कोणाला माहिती नाही, परंतु रिटर्न्स देण्याच्या दृष्टीने ते जबरदस्त आहे.
1. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्ली (Automotive stamping and assembly) :-
टाटा ग्रुपचा हा कमी-लोकप्रिय शेअर गेल्या एका वर्षात 1,500% पेक्षा जास्त वाढला आहे. एक वर्षापूर्वी, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबली शेअर 22 जानेवारी 2021 रोजी ₹ 35.95 वर बंद झाला, अन् आता तारीख 21 जानेवारी 2022 रोजी 614.10 रुपयापर्यंत पोहचला आहे. या कालावधीत या शेयर्सने 1,561.98% रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या कंपनीमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाखांचे 17 लाखांपेक्षा जास्त झाले असते.
2. टाटा टिनप्लेट (Tinplate Company of India) :-
टाटा टिनप्लेटचा (Tinplate Company of India) स्टॉक एका वर्षापूर्वी 22 जानेवारी 2021 रोजी ₹169.05 वर बंद झाला होता, तर 21 जानेवारी 2022 रोजी त्याचा बंद ₹371.70 होता. या कालावधीत या शेयर्सने 119.88% रिटर्न्स दिले आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज ₹ 2.19 लाख झाले असते.
3. ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लि. (Automobile Corporation of Goa Ltd.) :-
या ऑटोमोबाईल कंपनीचा स्टॉक एका वर्षापूर्वी 22 जानेवारी 2021 रोजी ₹467.25 वर बंद झाला, तर 21 जानेवारी 2022 रोजी स्टॉक ₹958.90 वर बंद झाला. या कालावधीत शेयर्सने 105.22% रिटर्न्स दिले आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज ₹ 2.05 लाख झाले असते.
4. नेल्को (Nelco) :-
टाटा ग्रुपचा हा स्टॉक ₹ 217.90 (NSE वर 22 जानेवारी 2021 रोजी बंद होणारी किंमत) वरून ₹ 844.40 पातळीवर वाढला आहे (NSE वर 21 जानेवारी 2022 रोजी बंद किंमत). या स्टॉकने 1 वर्षात 287.52% रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर 1 लाखांचे 3.87 लाख रुपये झाले असते.