शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- Fixed Deposit Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पुन्हा एकदा त्यांच्या मिटिंग मिटिंगमध्ये पाॅलिसी रेट्स बदलले नाहीत. Covid-19 आणि Omicronचा वाढता प्रभाव हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. एकीकडे काही लोक रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने खूश आहेत, तर दुसरीकडे काही लोकांची निराशाही झाली आहे. सध्या रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेट 3.55% आहे.
आरबीआयच्या मिटिंगनंतर काही संस्थांनी फिक्सड डिपाॅजिटचे दर बदलले आहेत. एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि बजाजा फायनान्सने (Bajaja Finance) एफडीचे रेट पूर्वीच्या तुलनेत वाढवले आहेत. अशा परिस्थितीत एफडी (FD) गुंतवणूकदारांनी काय करावं ते समजून घेऊया…
शॉर्ट टर्मच्या एफडीसाठी दर वाढवले :-
वाढलेल्या एफडी (FD) दरांचा फायदा कमी कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीत होईल. जर आपण फक्त एचडीएफसी बँकेचा विचार केला तर एफडीचे रेट 7 ते 29 दिवस, 30 ते 90 दिवस, 91 दिवस ते 6 महिने आणि 6 महिने 1 वर्षापेक्षा कमी शॉर्ट टर्म एफडीचे दर बदलले आहेत.
लॉग टर्म गुंतवणूक टाळा :-
गुंतवणूकदारांनी यावेळी दीर्घ कालावधीसाठी एफडीमध्ये (FD) गुंतवणूक करणे टाळावे. याची दोन कारणे, एक म्हणजे जेव्हा दर वाढतात तेव्हा गुंतवणुकीसाठी पैसे असतील. दुसरे, तुम्हाला FD च्या मॅच्युरिटीसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही.