PM Kisan।15 डिसेंबरला येणारा 10वा हप्ता तुम्हाला मिळेल का ? काय लिहिलंय स्टेट्स मध्ये स्टेप-बाय-स्टेप असं करा चेक !
शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- PM Kisan tenth Installment : PM Kisan चा 10वा हप्ता 15 डिसेंबरला येईल का ? हा प्रश्न सध्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या मनात आहे. डिसेंबर-मार्चचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु पुढील हप्ता या महिन्याच्या 15 तारखेला खात्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु लाभार्थी स्थिती पाहता अजून काही दिवस वाट पहावी लागेल असे वाटतं आहे.
मोदी सरकारने गेल्या वेळी 25 डिसेंबर रोजी डिसेंबर-मार्चचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये फक्त Rft Signed by State For 10nth Installment असं दिसत आहे. Rft म्हणजे Request For Transfer, म्हणजे ‘लाभार्थींच्या डेटाची राज्य सरकारने व्हेरिफिकेशन केलं असून, ती बरोबर असल्याचे आढळून आले आहे’. राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली आहे.
म्हणजेच, यानंतर FTO जनरेट करावा लागणार आहे. ज्याचा फुल फॉर्म म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. जर स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending आहे’ असा मेसेज दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरच ट्रान्सफर केला जाणार आहे.
म्हणजेच लाभार्थीचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड यासह इतर तपशील राज्य सरकारने तपासले आहेत आणि ते बरोबर आढळले आहेत, तुमची हप्त्याची रक्कम तयार आहे आणि ती तुमच्या बँक अकाउंटला पाठवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
अशा स्थितीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 10 वा हप्ता ठराविक दिवशीच जमा करतील असे दिसते. केंद्र सरकार 2000-2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकर्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये पाठवते. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 9 हप्ते पाठवले आहेत आणि 10वा हप्ता पाठवणार आहे. तुम्हाला हा हप्ता मिळेल की नाही यासाठी तुम्ही तुमचं स्टेट्स तपासलं पाहिजे.
सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ ‘चा ऑप्शन दिसेल.
येथे ‘‘Beneficiary Status’ या ऑप्शनवर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
नवीन पेज वर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता…
तुम्ही निवडलेल्या ऑप्शनची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व ट्रांजेक्शनची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.
तुम्हाला आठव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील येथे मिळेल.
जर तुम्हाला ‘FTO is generated and Payment confirmation is pending’ आहे असे लिहिलेलं दिसलं तर याचा अर्थ फंड ट्रान्सफर प्रोसेस सुरू झाली आहे. आणि हप्ता काही दिवसात तुमच्या खात्यात ट्रांसफर केला जाणार आहे.